मी माझी विचारधारा सोडून कुठंही जाणार नाही, नवनीत राणा असं का म्हणाल्या?

Published : Jun 26, 2026, 04:45 PM IST
Navneet rana

सार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी नवनीत राणा यांचे नाव चर्चेत होते. यावर बोलताना, आपण आपली विचारधारा सोडून कुठेही जाणार नाही असे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.

भाजपच्या नेत्या आणि मा. खासदार नवनीत राणा या कायमच चर्चेत येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर खासदार पदाचा राजीनामा दिला होता. त्या वेळी रिक्त झालेल्या जागेसाठी नवनीत राणा यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना तिकीट देण्यात आलं आणि ते खासदार म्हणून निवडून आले.

काय म्हणाल्या नवनीत राणा? 

नवनीत राणा यांनी यावेळी बोलताना आपलं मत व्यक्त केलं. आमच्या विरोधात सर्व नेते आहेत. पण तरीही रवी राणा चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. राज्यसभेसाठी मी सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. अनेक लोक असं म्हटली की, नवनीत राणा खासदार पदाचा तिकीट भेटावं म्हणून मी एनसीपीच्या दारात गेली. पण मी माझी विचारधारा सोडून कुठंही जाणार नाही.

लोकसभा निवडणुकीसाठी घेतल्या गाठीभेटी 

नवनीत राणा यांनी राज्यसभेची उमेदवारी भेटावी म्हणून नवनीत राणा यांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा झाली होती. मात्र राष्ट्रवादीने हि जागा स्वतःकडेच ठेवत प्रफुल पटेल यांचे समर्थक जैन यांना उमेदवारी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवनीत राणा यांनी आतापासून तयारी सुरु केली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ketan Agarwal Pune Case : बचावासाठी चेतन, सियाचे एकमेकांना गुंतवण्याचे प्रयत्न
Gold Silver Rate : सोने दरात पुन्हा घसरण, पण नेमकी कारणं काय? जाणून घ्या मुंबईतील आजचा गोल्ड रेट