Gold Silver Rate : सोने दरात पुन्हा घसरण, पण नेमकी कारणं काय? जाणून घ्या मुंबईतील आजचा गोल्ड रेट

Published : Jun 26, 2026, 12:54 PM IST
Gold - Silver Rate Today

सार

सोने - चांदी दरात आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाली आहे. सोन्याच्या किमतीवर अनेक गोष्टींचा परिणाम होत असल्याने सोने - चांदी दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जाणून घ्या मुंबईतील आजचा भाव. 

मुंबई : आज मोहरमनिमित्ताने मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX सकाळच्या सत्रात बंद आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव सलग चौथ्या आठवड्यात खाली उतरला आहे. मात्र भारतीय सराफा बाजारात सोने दरात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर २७० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आज शुक्रवारी २६ जून २०२६ रोजी सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा भाव १,४१,६०० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २५० रुपयांनी घसरला आहे. या घसरणीस २२ कॅरेटचा १० ग्रॅमसाठीचा दर १,२९,८०० रुपये इतका आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर वधारला आहे. या वाढीसह १८ कॅरेटचा भाव एक तोळ्यासाठी १०६२०० रुपयांवर व्यवहार करत आहे.

दुसरीकडे चांदीचा भाव वाढला आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात ५००० रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे एक किलो चांदीचा भाव २,४०,००० रुपये इतका सराफा बाजारात व्यवहार करतो आहे.

मुंबईत आजचा सोन्याचा २४ कॅरेटचा भाव १,४१,६०० रुपये १० ग्रॅम इतका आहे. २२ कॅरेटचा भाव १,२८,९०० रुपये आहे. तर १८ ग्रॅमचा भाव १०६२०० असा आहे.

सोने दरात घसरण का?

सोन्याच्या दरातील कमी झालेल्या किमतीमागे अनेक कारणं आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेत व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे डॉलरच्या दरात वाढ झाली आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार कधीही मोडू शकतो, याचाही अंदाज गुंतवणूकदार घेत आहेत. त्यामुळे अशा सर्व गोष्टींचा सोने दरावर परिणाम होत आहे.

दरम्यान, गुरुवारी अमेरिकेत जाहीर एक आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार मे महिन्यात महागाई आणखी वाढली असल्याचं समो आलं आहे. महागाईचा दर तीन वर्षांत पहिल्यांदाच ४.० टक्क्यांच्या वर गेला. अमेरिकेची मध्यवर्ती बँक या वर्षात तीन वेळा व्याजदर वाढवेल, अशी अपेक्षा आहे. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होतो आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणात संजय राऊतांच ट्विट, म्हणाले...
Pune Ketan Agarwal : “तर तिला देखील लोहगडावरुन ढकला”