बिबट्या जवळ येऊ नये म्हणून काय करावं, जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाच्या टिप्स घ्या जाणून

Published : Nov 24, 2025, 11:19 AM IST

महाराष्ट्रात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापासून बचाव करण्यासाठी घराभोवती झुडपे वाढू देऊ नका, रात्री एकटे बाहेर पडू नका, परिसरात प्रकाश ठेवा आणि कचरा उघड्यावर टाकू नका.

PREV
15
बिबट्या जवळ येऊ नये म्हणून काय करावं, जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाच्या टिप्स घ्या जाणून

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांवर बिबट्याने हल्ला केल्यामुळं ते घाबरून गेले आहेत. त्यामुळं अशावेळी काय करावं याची अनेक नागरिकांना कल्पना नाही.

25
घराजवळ झुडपं वाढून देऊ

घर किंवा शेताजवळ उंच झुडपं, दाट गवत आणि लपण्यासारखी जागा ठेवू नका. उसाच्या शेजारी आपलं घर असल्यास आपण खबरदारी घेणं आवश्यक असतं. घराची जागा त्यामुळं शेतापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

35
रात्री एकटं फिरायला बाहेर जाऊ नका

रात्री शक्य असेल तर एकटं बाहेर पडू नका. बिबट्या रात्री जास्त सक्रिय असतो, त्याच्यावर हल्ला होतोय हे त्याला लक्षात आल्यावर तो परत प्रतिहल्ला करतो. त्यामुळं रात्री अंधार पडल्यानंतर घराच्या बाहेर पडू नका.

45
घराच्या परिसरात मोठी लाईट घेऊन घ्या

घराच्या परिसरात मोठी लाईट लावून घ्या. लाइटमुळे आपल्याला लांब कोणी आहे का, हे लक्षात येत असतं. शक्यतो उजेड असल्यास बिबट्या माणसाच्या जवळपास येत नाही.

55
कचरा उघड्या जागेवर ठेवू नका

आपण शक्यतो कचरा हा उघड्या जागेवर ठेवू नका. कचऱ्याच्या वासाने आणि भुकेने बिबट्या त्याच्या जवळपास येण्याचा प्रयत्न करतो, आपण कचऱ्याची योग्य जागेवर विल्हेवाट लावल्यावर आपल्याला बिबट्याची भीती राहणार नाही.

Read more Photos on

Recommended Stories