गिरीश महाजन यांनी सोडलं मौन, तरुणीसोबतच्या फोटोवर काय केला दावा?

Published : Jun 20, 2026, 05:52 PM IST
Girish Mahajan

सार

भाजप नेते गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो मॉर्फ केलेले असल्याचा दावा करत, महाजन यांच्यावतीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वतः गिरीश महाजन यांनीही यावर मौन सोडत सखोल चौकशीची मागणी केली असून सविस्तर खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे.

गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये असणारी हि तरुणी कोण याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न विचारले होते. या छायाचित्रांमुळे राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यावर आता गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिल असून त्यांनी त्याबद्दलची माहिती दिली आहे.

गिरीश महाजन यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्याने काय केली मागणी? 

गिरीश महाजन यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्याने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी हे फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुक या मध्यमवरून काढून टाकण्यात यावेत असं म्हटलं आहे. सायबर पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी एक महत्वाची एक गोष्ट नमूद केली आहे. फोटोशॉपद्वारे त्यांनी फोटो मॉर्फ करून बदनामी करण्यात आली आहे.

नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा केला दाखल 

नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंस्टाग्राम आणि एक्स पोस्ट मॉर्फ केलेलं फोटो काढून टाकण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्या हँडल्सवरून फोटो शेअर केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असं म्हटलं आहे.

गिरीश महाजन यांनी सोडलं मौन 

गिरीश महाजन यांनी या प्रकरणावरच मौन सोडलं आहे. मी याबाबत सविस्तर खुलासा करणार आहे. मी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. फोटो मॉर्फिंग करून ते पोस्ट केले जात आहेत. मी यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी यावर सविस्तर खुलासा करेन असं महाजन यांनी म्हटलं आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक