
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आपल्या कारवाईचा धडाका लावला आहे. त्यांनी आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यावर धडक कामगिरी करायला सुरुवात केली. तसेच यापुढे तंबाखू, गुटखा आणि तत्सम पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांवर धडक कारवाई केली जाईल असं सांगितलं. तुकाराम मुंडे यांच्या या कामगिरीमुळं विक्रेते घाबरून गेले आहेत.
यावेळी छगन भुजबळ यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, तुकाराम मुंडे हे चांगली कामगिरी करत असून त्यांच्या या धडक कारवाईचे आपण स्वागत करायला हवं. यावेळी भुजबळ यांनी कॉल करून अन्न आहे त्याच्यात भेसळ होत असेल तर नक्कीच कडक कारवाई करा असं मुंडे यांना सांगितल्याचं म्हटलं आहे.
या अन्नात भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावायलाच पाहिजे असं ठामपणे भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे. तुम्हाला माहित असून तुम्ही भेसळयुक्त जेवण देऊन लोकांच्या जीवाशी खेळता असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. अशा लोकांवर कारवाई करायला हवी आणि ती कडक स्वरूपातील हवी असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.
आपण ठराविक मेडिकलमधून औषधे घेऊ नका असं यावेळी मुंडे यांनी बोलताना म्हटलं आहे. रुग्णालयातील फार्मसीमधून औषधे खरेदी करणे बंधनकारक नाही आणि कुठून औषधे घ्यायची याचा अधिकार रुग्णाच्या नातेवाईकांचा असल्याचं यावेळी मुंडे यांनी म्हटलं आहे. या आदेशाचे जे पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं मुंडे यांनी म्हटलं आहे.