तुम्ही हा आसूड चालवायचाय, उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केलं अवाहन

Published : Jun 28, 2026, 03:08 PM IST
Uddhav Thackeray

सार

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी परभणी दौऱ्यात फुटीर खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो तेव्हा हे गद्दार कुठे होते असा सवाल करत, महात्मा फुलेंनी दिलेला आसूड आता चालवण्याची वेळ आल्याचे ठाकरे म्हणाले.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज परभणी दौऱ्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी आक्रमक शब्दांमध्ये भाषण केलं. त्यांनी यावेळी येथील फुटीर खासदार संजय जाधव यांच्यावर टीका केली. आपण शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. त्यावेळी आपण शेतकऱ्यांना भेटलो, यावेळी गद्दार कुठं होता असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आम्ही लक्ष द्यायला पाहिजे होत 

आम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं असं यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांना आसूड दिला. तोच आसूड तुम्ही मला भेट दिला, आता हा आसूड तुम्ही चालवायचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. आमच्याकडं आता फक्त तीन खासदार राहिले म्हणजे आम्ही संपलो असं होत नाही.

संजय जाधव यांच्यावर केली टीका 

संजय जाधव यांच्यावर यावेळी उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. त्यांनी यावेळी बोलताना मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो होतो. त्यावेळी संजय जाधव माझ्यासोबत नव्हते असा उल्लेख केला. मला अजूनही लोकसभा अध्यक्षांवर विश्वास आहे. ते योग्य कारवाई करतील असं यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

लाचार होणार हिंदू नाही, उद्धव ठाकरेंची तोफ नागपुरात धडाडली
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या टीमने बेंगलोर अय्यंगार बेकरीवर टाकली धाड, घाण पाहून डोकं होईल बधिर