राज्यात कुठंच संतोष दिसत नाही, उद्धव ठाकरे राज्य सरकारवर बरसले

Published : Jun 28, 2026, 01:45 PM IST
uddhav Thackeray

सार

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी परभणीत कार्यकर्ता मेळावा घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कोणीही आनंदी नसून, पेपरफुटी आणि खासदार फोडण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. 

खासदार फुटीनंतर आता ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करायला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत राऊत यांची तोफ धडाडत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा येथील परभणीत आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील आहे.

राज्यात कोणीच नाही आनंदी 

राज्यात कोणीच आनंदी नसल्याचं यावेळी ठाकरे यांनी म्हटलं आहे. देशाच्या कोणत्याच राज्यात संतोष नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. ज्यावेळी मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली, त्यावेळी माझ्याकडून सगळं करून घेतलं. आमचं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं. यांना मराठा समाजाला एकमेकांमध्ये झुंजवत ठेवायचं आहे.

आज पेपर फुटत आहे 

आज पेपर फुटत आहे. खासदार फुटत आहे. आज होणारा टीईटीचा पेपर फुटला. सध्या सगळीकडं अंधांधुंद चालू झाली आहे. राज्यात कोणीही आनंदी नसल्याचं यावेळी बोलताना ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे सर्व फुटीर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन दौरे करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळं कार्यकर्ते राहतात की जातात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ketan Lohagad Case : सख्ख्या भावानेच सियाचे आरोप फेटाळले, १० तासांची चौकशी; केतनच्या हत्येप्रकरणात काय म्हणाला?
'राऊतांच्या बोलण्यामुळे ठाकरेंचा पक्ष कमजोर होतोय', उबाठाच्या सभेनंतर खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया