Weather Update : रविवारी होणार हवामानात बदल, कोकणात अलर्ट; मुंबई, ठाण्यात पावसाची शक्यता

Published : Aug 10, 2025, 09:59 AM IST

मुंबई : मुंबईसह कोकणात पावसाच्या सरी कोसळत आहेत. याशिवाय रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सतर्कलेचा इशारा हवामान खात्याने दर्शवला आहे. जाणून घेऊया राज्यातील एकूणच पावसाचा अंदाज...

PREV
15
राज्यातील पावसाचा अंदाज

कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये शनिवारी पावसाने हजेरी लावली होती आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या आठवड्यात रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने मुंबईत उकाडा जाणवत होता, मात्र आज कोकण किनारपट्टीसह अनेक भागांत सरींची शक्यता असल्यामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो.

25
मुंबईतील पावसाचा अंदाज

मुंबईत उकाड्यातून दिलासा, पण आर्द्रता कायम मुंबईत आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची विश्रांती असल्यामुळे उकाड्याचा त्रास वाढला होता. हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने घामाच्या धारांना मुंबईकरांना सामोरे जावे लागेल. आज कमाल तापमान सुमारे 31°C आणि किमान तापमान 26°C राहील. दुपारच्या सुमारास काही भागांत पावसाची तीव्रता किंचित वाढू शकते.

35
पालघर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन

पालघर जिल्ह्यात आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच आभाळ भरून आले आहे आणि अधूनमधून सरी बरसतील. गेल्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण कमी झाले होते, परंतु आजच्या हवामानामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळू शकतो. येथे कमाल तापमान सुमारे 30°C आणि किमान तापमान 25°C राहील. आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने किंचित उकाडा जाणवेल.

45
ठाणे आणि नवी मुंबईतील स्थिती

ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता आहे. मागील काही दिवस उकाड्यामुळे अस्वस्थता जाणवत होती, पण आजच्या पावसामुळे थोडा दिलासा मिळेल. दिवसभर आभाळ भरून राहील आणि अधूनमधून सरी बरसतील. या भागांत कमाल तापमान 30°C ते 31°C दरम्यान, तर किमान तापमान 25°C च्या आसपास राहील. आर्द्रतेमुळे उकाडा मात्र कायम राहू शकतो.

55
कोकण किनारपट्टीवर मासेमारांसाठी सतर्कतेचा इशारा

कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत आज हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाचा जोर मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी असला तरी, ढगाळ वातावरण कायम राहील. या भागांत कमाल तापमान 30°C ते 31°C दरम्यान, तर किमान तापमान 24°C ते 25°C राहील. समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग मध्यम असू शकतो, त्यामुळे मासेमारीसाठी बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Read more Photos on

Recommended Stories