Weather Update : नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून देशभरात हवामानात मोठे बदल दिसत आहेत. पावसाचा जोर ओसरत असतानाच आता थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट तर महाराष्ट्रातही तापमान घटत आहे.
देशात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढ-उतार दिसत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता वातावरणात गारठा वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी चंदीगड, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
24
महाराष्ट्रात थंडीबरोबरच काही भागांत पावसाची शक्यता
राज्यातील अनेक भागात थंडीची लाट आली असतानाच काही ठिकाणी पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम असल्याने तामिळनाडू आणि केरळमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, परभणी, जळगाव, जेऊर या भागात थंडीचा कडाका वाढू शकतो.
34
पुण्यात तापमान घसरले, राज्यात वाढला कडाका
गेल्या दोन ते तीन दिवसांत सायंकाळी थंडीचा कडाका जाणवतो आहे. पुण्यात तब्बल 13.4 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदले गेले आहे. हवामान खात्यानुसार, पावसानंतर तापमान सतत घटत असून राज्यभर थंडी वाढत आहे.
44
पुढील काही दिवसात तापमानात आणखी घट
IMDने अंदाज वर्तवला आहे की, राज्यातील किमान तापमानात पुढील काही दिवसांत 4 ते 5 अंशांची घसरण होऊ शकते. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभर हवामान थंड होत चालले आहे. 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी काही भागांत थंडीची लाट निर्माण होऊ शकते. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.