
Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाचे वातावरण आता हळूहळू निवळत चालले असले तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे. 29 जुलै 2025 रोजीच्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील, मात्र हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि उपनगरांसाठी कुठलाही अलर्ट जारी केलेला नाही. जनजीवन सुरळीत राहण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जाहीर.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा फारसा जोर दिसणार नाही, त्यामुळे अलर्ट नाही.
पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
इतर जिल्हे जसे की सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे हलक्या सरींशिवाय उघडीप राहणार आहे.
धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही.
या भागात श्रावणातील सौम्य सरी अनुभवायला मिळतील, परंतु मुसळधार पावसाचा धोका नाही.
छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांमध्ये क्वचित ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
सध्या या भागात कोणताही पावसाचा अलर्ट दिलेला नाही.
नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक.
राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान निवळले असले, तरी 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर संभवतो. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगावी.