Washim Crime : वाशिममध्ये धक्कादायक घटना! ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून

Published : Aug 08, 2026, 09:13 AM IST
Washim Crime : वाशिममध्ये धक्कादायक घटना! ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून

सार

महाराष्ट्राच्या वाशिममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका लष्करी जवानाने आपल्या ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. पत्नीच्या भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जवान आणि त्याच्या आई-वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्करात (Indian Army) काम करणाऱ्या एका जवानाने आपल्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीची, दिपालीची, गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. ज्ञानेश्वर मदने (वय २८) असं आरोपी जवानाचं नाव असून, तो लष्कराच्या ६ मराठा बटालियनमध्ये तैनात आहे. दिपालीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मदने आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

'ती घरात पडली', कुटुंबीयांना दिली खोटी माहिती

दिपालीचा भाऊ राहुल माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी ३ वाजता ज्ञानेश्वरने त्यांना फोन केला. 'दिपाली घरात पडली असून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे,' असं त्याने सांगितलं. ही बातमी कळताच दिपालीचे कुटुंबीय मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातून वाशिमसाठी निघाले. ते संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास वाशिममध्ये पोहोचले. एका वृत्तानुसार, ही माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, ज्ञानेश्वर दुसऱ्या दिवशी जम्मू-काश्मीरला ड्युटीवर जाणार होता.घरात पती-पत्नीत काहीतरी वाद झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. याच वादातून ज्ञानेश्वरने दिपालीचा गळा दाबला. त्यानंतर त्याने तिला रुग्णवाहिकेतून एका खासगी रुग्णालयात नेलं. पण तिथल्या डॉक्टरांनी तिला सरकारी रुग्णालयात नेण्यास सांगितलं.

डॉक्टरांना आला संशय

सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिपालीची तपासणी केली. तेव्हा त्यांना हा अपघाती मृत्यू नसल्याचा संशय आला. तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस अधिकारी मनीष ठाकरे म्हणाले की, "रुग्णालयातून आम्हाला माहिती मिळाली की एका महिलेला रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं आहे."

"आमची टीम हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा काहीतरी गडबड असल्याचं स्पष्ट दिसत होतं," असं ठाकरे यांनी सांगितलं. पोलिसांना दिपालीच्या गळ्याभोवती जखमेच्या खुणा स्पष्टपणे दिसल्या.

कुटुंबीयांचा छळाचा आरोप

दिपालीच्या भावाने आरोप केला आहे की, ज्ञानेश्वरचे विवाहबाह्य संबंध होते आणि याच मुद्द्यावरून तो दिपालीचा छळ करत होता.

त्यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी हा वाद खूप वाढला होता, तेव्हा दोन्ही कुटुंबांनी एकत्र बसून तो मिटवला होता. पण त्यानंतरही ज्ञानेश्वरचा छळ सुरूच होता, असा दावा त्यांनी केला आहे. ज्ञानेश्वरला अटक करण्यात आली असून, त्याच्या आई-वडिलांवरील आरोपांचीही पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Pune Crime : निगडीत मंदिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मेट्रो कामगार अटकेत
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर