Vilas Ghule Case : विलास घुले प्रकरणात खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरभची आज SIT चौकशी

Published : Jun 27, 2026, 09:45 AM IST
Vilas Ghule Case

सार

Vilas Ghule Case : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले या तरुणाची हत्या झाल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी आता खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलाची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vilas Ghule Case : बीडमधील केज तालुक्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेला हॉटेल मालक विलास घुले याच्यावर धारधार शस्राने वार केले गेले. यामध्ये विलास घुले याचा मृत्यू झाला. अशातच या प्रकरणात खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलावर आरोप लावण्यात आले आहेत. याच प्रकरणी सौरभ सोनावणे याची चौकशी होणार आहे.

सौरभ सोनावणेची चौकशी

विलास घुले प्रकरणात खासदार बजरंग सोनावणे यांचा मुलगा सौरभची चौकशी केली जाणार आहे. यासाठी एसआयटीची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. यांच्या माध्यमातून सौरभची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला खासदार बजरंग सोनावणे यांनी मुलगा दोषी असल्यास शिक्षा द्या असे विधान केले आहे.

सौरभ सोनावणे याची प्रतिक्रिया

सौरभ सोनावणे याने विलास घुले प्रकरणात आरोप झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. सौरभने म्हटले की, विलास घुलेच्या हत्येप्रकरणात आरोपींवर कारवाई करावी. पण ज्यावेळी हत्या झाली तेव्हा मी दुपारपर्यंत येडेश्वरी कारखान्यात होतो. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरीच होतो. याशिवाय माझी गाडी सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसत नाही. खरंतर, राजकीय द्वेषातून माझ्यावर हे आरोप केले जात असल्याचेही सौरभने म्हटले.

धनंजय मुंडेंकडून प्रश्न उपस्थितीत

विलास घुलेच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांच्याकडून काही प्रश्न उपस्थितीत करण्यात आले आहेत. धनंजय मुंडे यांनी म्हटले की, या प्रकरणात 9 आरोपींना ताब्यात घेतले. पण एका आरोपीला मोकाट सोडले. तो पोलिसांचा लाडका आहे का? याशिवाय माझे कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. हे प्रकरण गुन्हेगारीचे आहे. दहाव्या आरोपीच्या अटकेसाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही मुंडे यांनी दिला. दरम्यान, या घटनेबद्दल विधानसभेत प्रश्न उपस्थितीत केले आहेत. सर्वांना समान न्याय असावा अशी भूमिका मुंडे यांनी घुले प्रकरणात घेतली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

उद्धव ठाकरेंचा आजपासून विदर्भ दौरा, फुटीर खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघात पहिली सभा
Maharashtra Rain Update : राज्यातील 15 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, मुंबईतही मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज