उद्धव ठाकरेंचा आजपासून विदर्भ दौरा, फुटीर खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघात पहिली सभा

Published : Jun 27, 2026, 08:47 AM IST
Uddhav Thackeray Vidharbha Visit

सार

उबाठामध्ये सहा खासदार फुटल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षात मोठा भूकंप झालाय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे सहा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत.

Mumbai : उद्धव ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर अशणार आहे. काल रात्रीच उद्धव ठाकरे नागपूरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह पक्षातील नेतेमंडळी देखील आहेत. या दौऱ्यादरम्यान, उद्धव ठाकरे त्यांच्या उबाठामधून फुटलेल्या सहा खासदरांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. याची सुरुवात यवतमाळपासून करणार आहे.

यवतमाळमध्ये पहिली सभा

उद्धव ठाकरे त्यांच्या उबाठामधून बाहेर पडलेल्या खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघात पहिली सभा घेणार आहे. ही सभा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. संजय देशमुखांसारखा जनतेने निवडून दिलेला खासदार फुटल्याने उद्धव ठाकरे तेथील जनतेची माफीही मागणार असल्याचे बोलले जात आहे.या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यवतमाळ, वाशिम, हिंगोलीत सभा घेणार आहेत.

हिंगोलीत दुसरी सभा

यवतमाळमधील कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर हिंगोलीत दुसरी सभा घेणार आहेत. खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या मतदारसंघात सभा घेतील. यावेळी मदतरासंघातील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांचा कसा समाचार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा एकत्रित प्रवास

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित विमानाने प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. या दोघांच्या प्रवासावर अनेक तर्कवितर्क लावले गेले. मात्र ही एक औपचारिक भेट असण्यासह केवळ योगायोग असू शकतो असे सांगितले जातेय.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Rain Update : राज्यातील 15 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, मुंबईतही मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' तारखेला येणार मुसळधार पाऊस