वाल्मीक कराडवर तुरुंगात गित्ते गँगकडून हल्ला?, सुरेश धस यांच्या दाव्याने उडाली खळबळ!

Published : Mar 31, 2025, 02:06 PM IST
Walmik Karad

सार

बीड जिल्ह्यातील कारागृहात वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हल्ला झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी गित्ते गँगवर हल्ल्याचा आरोप केला असून, या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Valmik Karad Jail Attack: बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार, तुरुंगात असलेल्या वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर गित्ते गँगकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला बबन गित्ते यांचे सहकारी महादेव गित्ते यांनी केल्याचा आरोप आहे.

हल्ल्याचे नेमकं कारण काय?

आमदार सुरेश धस यांच्या म्हणण्यानुसार, वाल्मीक कराड आणि महादेव गित्ते यांच्यातील जुने वैर हा या हल्ल्याचे मुख्य कारण आहे. परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडने महादेव गित्ते आणि बबन गित्ते यांना गुंतवून खोटे आरोप लावले असल्याचा दावा बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांनी केला होता. या "जुन्या रागातून" महादेव गित्ते यांनी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.

आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया

सुरेश धस यांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितले, "बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांच्यातील रागामुळे वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हल्ला झाला आहे. या घटनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी मी बीड कारागृहाकडे जात आहे." धस यांनी असेही म्हटले आहे की, "जोपर्यंत बबन गित्तेला संपवत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ वाल्मीक कराडने घेतली होती. तर दुसरीकडे बबन गित्तेनेही कराडचा खून करण्याचा निश्चय करून दाढी काढणार नाही, असा निर्धार केला आहे."

नेमकं काय आहे बापू आंधळे खून प्रकरण?, समजून घेऊयात

ही घटना बापू आंधळे खून प्रकरणाशी जोडलेली आहे, ज्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी:

जून 2024 मध्ये परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली.

मुख्य आरोपी:

या प्रकरणात बबन गित्ते, महादेव गित्ते, मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर खून आणि खूनाचा प्रयत्न केल्याचे आरोप ठेवले गेले.

बबन गित्तेचा पळ:

गुन्हा दाखल झाल्यानंतर बबन गित्ते फरार असून अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह:

तुरुंगात आरोपींवर हल्ला झाल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उठले आहेत. तुरुंगात अशी घटना कशी घडली? या प्रश्नावर समाज आणि राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला आहे, तर सुरेश धस यांचे बीड कारागृहात जाणे हे या घटनेच्या अधिक सखोल चौकशीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर