Vaishnavi Hagavane Suicide Case: 'एक तर मी, नाहीतर मृत्यू!' - शशांकच्या धमकीचा थरकाप उडवणारा खुलासा

Published : May 27, 2025, 09:27 PM IST
Vaishnavi Hagawane Case

सार

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. शवविच्छेदन अहवालात २९ जखमा आढळल्या असून, हुंडा आणि छळाचा आरोप आहे.

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि लग्नाला विरोध

वैष्णवीच्या वडिलांनी सुरुवातीपासूनच शशांक हगवणे याच्याशी तिच्या लग्नाला विरोध केला होता. याचे मुख्य कारण म्हणजे हगवणे कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी. वडिलांचा विरोध असतानाही वैष्णवी आणि शशांकने प्रेमविवाह केला.

धमकी आणि छळाचा पाश

समोर आलेल्या माहितीनुसार, वैष्णवीला इतर दोन स्थळं आली असताना, शशांकने त्यांनाही थेट फोन करून धमकावले होते. "मी आणि वैष्णवी प्रेमविवाह करणार आहोत, त्यामुळे तुम्ही मध्ये पडू नका," अशी धमकी त्याने दिली होती. याशिवाय, वैष्णवीला वारंवार "तू दुसऱ्याशी लग्न केलंस, तर तुला आणि त्यालाही मारून टाकीन", "तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन" अशा धमक्या दिल्या जात होत्या. हे सर्व तिच्या मोबाईलमधील काही चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग्जमधून पोलिसांना आढळून आले आहे.

धक्कादायक शवविच्छेदन अहवाल

वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालाने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण दिले आहे. तिच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या असून, त्यापैकी १५ जखमा मृत्यूपूर्वीच्या २४ तासांत झाल्या होत्या. हा अहवाल वैष्णवीवर झालेल्या शारीरिक छळाची भयावहता दर्शवतो.

हुंड्यासाठी छळ आणि अमानुष मागणी

लग्नात हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या वडिलांकडून ५१ तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्यूनर कार असा भरमसाठ हुंडा घेतला होता. एवढेच नाही तर, वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करायला लावले होते. लग्नानंतरही सासरचे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, पती शशांक हगवणे यांच्यासह सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांच्याकडून वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. माहेरातून पैसे आणण्यासाठी तिला सातत्याने मारहाण केली जात होती. याच अमानुष छळाला कंटाळून वैष्णवीने आपले जीवन संपवले.

पोलिसांची कारवाई

या प्रकरणी पोलिसांनी शशांक हगवणे, त्याची सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडी २८ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी हगवणे कुटुंबियांच्या घरातून पहार, साडी, स्टूल, वैष्णवीचा मोबाईल, घरातील सीसीटीव्हीचे व्हिडिओ, तसेच हुंड्यात मिळालेली एक दुचाकी, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी आणि दोन पिस्तूल जप्त केली आहेत. तसेच, पाचही आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. हुंड्यामध्ये मिळालेले ५१ तोळे सोने आरोपींनी एका बँकेत तारण ठेवले आहे, त्याची चौकशी अजूनही सुरू आहे.

या प्रकरणाने समाजात हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाच्या गंभीर मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. पोलिसांच्या पुढील तपासात आणखी कोणते खुलासे होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!