राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' तारखेला येणार मुसळधार पाऊस

Published : Jun 26, 2026, 11:06 PM IST
IMD Monsoon Rain Alert

सार

राज्यात २२ जूनपासून पावसाला सुरुवात झाली असून पेरण्यांना वेग आला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी २७ जून ते १ जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, परतीचा पाऊसही जोरात होणार असल्याने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाला २२ जूनपासून सुरुवात झाली आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला. आता या मान्सूनमुळे पेरण्यांना वेग आला. २७ जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगितलं आहे. २७ जूनपासून १ जुलैपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाला होणार सुरुवात 

कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. या हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज वर्तवला आहे. २५ जूनपर्यंत चांगला पाऊस झाला. परतीचा पाऊस जोरात होईल असा अंदाज वर्तवला आहे. यंदा पावसावर अल निनोचं सावट वर्तवलं आहे. पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार परतीचा पाऊस जोरात होणार आहे. त्यामुळं खरीप आणि रब्बी हंगामातील पिके चांगले येण्याची शक्यता आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास, दोघांमधील संवाद व्हायरल
LIVE: अयोध्या राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर | प्रकल्प प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांची विशेष मुलाखत | राजेश कालरा