ठाकरेंची 5 नोव्हेंबरपासून प्रचाराची तोफ धडाडणार, शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा!

शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. कोकणातून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात ते 20 ते 25 जाहीर सभा घेणार असून, महायुतीच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यासाठी रणनीती आखली आहे.

Rameshwar Gavhane | Published : Oct 30, 2024 2:54 PM IST

Maharashtra Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या उंबरठ्यावर, शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या प्रचारसभांचा प्रारंभ कोकणातील रत्नागिरीत होणार असून, यावेळी त्यांनी महायुतीच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यासाठी रणनीती आखली आहे.

कोकणात सभा, महायुतीला गाठणार आव्हान

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु लोकसभा निवडणुकीत महायुतीने येथे विजयी ठरले. यामुळे उद्धव ठाकरे यांची कंबर कसली आहे, आणि त्यांनी यंदाच्या निवडणुकांसाठी खास लक्ष केंद्रित केले आहे. 5 नोव्हेंबरपासून 17 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात उद्धव ठाकरे 20 ते 25 जाहीर सभा घेणार आहेत.

ठाकरे गटाची तयारी

उद्धव ठाकरे यांचा प्रचार दौरा रत्नागिरीतून सुरू होणार असला तरी, 16 नोव्हेंबर रोजी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातही सभा होणार आहे. या सभांमध्ये आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यासारखे प्रमुख नेतेदेखील सहभागी होणार आहेत.

राजकीय रणांगणात गडबड

राज्यातील 288 मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्या आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार असून, ठाकरे, पवार, फडणवीस, शिंदे यांसारखे दिग्गज राजकारणी प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेही या निवडणुकीत माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

पंतप्रधान मोदींची महत्त्वाकांक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्रात 10 ते 15 सभा घेणार आहेत. दिवाळीनंतर, म्हणजेच अंतिम टप्प्यात, मोदी प्रमुख मतदारसंघांमध्ये प्रचार करणार आहेत. भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली असून, यात केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

 यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. आता दिवाळीनंतरच खरे फटाके फुटणार आहेत, हे निश्चित!

आणखी वाचा :

देवेंद्र फडणवीसांचा नवा अंदाज, 'मुख्यमंत्रीपदाची लालसा नाही'

 

Read more Articles on
Share this article