Tukaram Munde | तुकाराम मुंढेंची बदली करू नये यासाठी समर्थकांकडून दुग्धाभिषेक

Published : Jun 25, 2026, 01:55 PM IST
Tukaram Mundhe

सार

Tukaram Mundhe : एफडीएच्या आयुक्तपदी अलीकडेच तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर मुंढे यांनी राज्यातील विविध ठिकाणी भेसळयुक्त पदार्थांविरोधात धाडी टाकत कारवाया केल्या. मात्र आता मुंढे यांची बदली करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Tukaram Mundhe : अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार अलीकडेच तुकाराम मुंढे यांना देण्यात आला होता. यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यातील विविध ठिकाणी भेसळयुक्त पदार्थांच्या विरोधात धडक कारवाया सुरू केल्या. तुकाराम मुंढे यांच्याकडे परभणीच्या पालक सचिव पदाची धुरा देण्यात आली होती. मात्र हे पद आता काढून घेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करू नये म्हणून समर्थकांनी आंदोलन केले.

सांगतील तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक

पाणी संघर्ष समितीकडून तुकाराम मुंढे यांची बदली करू नये अशी मागणी केली आहे. याशिवाय तुकाराम मुंढे याच्या प्रतिमेस समर्थकांकडून दु्ग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी समर्थकांनी म्हटले की, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अशा तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाजी धाडी टाकल्या. यामध्ये भेसळयुक्त अन्नाच्या विरोधात कारवाया केल्या. यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी होणारा खेळ हा थांबला जात आहे. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांडे प्रांताधिकारी मार्फत निवेदन पाठवलं आहे.

तुकाराम मुंढेंना कार्यकाळापर्यंत ठेवा

दूध, श्रीखंडासह अन्य गोष्टींमध्येही भेसळ केली जात होती. पण तुकाराम मुंढे यांच्या बेधड कारवाईमुळे याला आळा बसत आहे. या कारवाईची भीती प्रत्येकाला पाहिजे. भेसळयुक्त पदार्थांचा कारभार थांबवला गेला पाहिजे. याचा खरोखरच फायदा शेतकऱ्यांना होईल. याशिवाय आंदोलन ते कोणासाठी नव्हे, पैशांसाठी नाही,तर तुकाराम मुंढे प्रामाणिक माणूस आहेत म्हणून करतोय. तुकाराम मुंढे आम्हाला तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी हवेत अशीही मागणी समर्थकांनी केली.

पालक सचिवांची जबाबदारी काढली

परभणीच्या पालक सचिवांची जबाबदारी तुकाराम मुंढे यांना दिली होती. पालक सचिवांची जबाबदारी काढून घेण्यात आली. याबदली आता चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे पालक सचिवांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंढे यांची बदली होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Abhijeet Dipke: आजीचं निधन, तरीही अभिजीत डिपके पोलिसांच्या ताब्यात; CJP कडून सुटकेची मागणी
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल