ओमराजेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, ठाकरेंना सोडल्यास...

Published : Jun 17, 2026, 07:00 PM IST
uddhav thackeray

सार

खासदार ओमराजे निंबाळकर, जे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत मानले जात होते, ते आता एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा आहे. त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की, ठाकरेंना सोडल्यास ते लोकांमध्ये नजर मिळवू शकणार नाहीत. या घडामोडीनंतर धाराशिवमधील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहू असं म्हणणारे खासदार आता एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळालेत. त्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचा समावेश झाला आहे. त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऑपरेशन टायगरबद्दल बोलताना ओमराजे यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

ओमराजे काय म्हणाले?

 एकदाही ग्रामपंचायत निवडणूक न लढवलेल्या व्यक्तीला उद्धव ठाकरे साहेबांनी एकदा आमदार आणि दोनदा खासदार केलं. मी जर त्यांना सोडलं तर लोकांशी नजर मिळवू शकणार नाही असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ओमराजे यांनी २००९चा यावेळी खासकरून उल्लेख केला आहे.

२००९ साली मी साधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नव्हती. त्यावेळी उद्धव साहेबानी विधानसभेची संधी दिली, राजकारणात आलो. एकदा विधानसभेत आणि दोनदा लोकसभेत उद्धव साहेबांमुळे काम करता आल असा उल्लेख या व्हिडिओमध्ये ओमराजे यांनी केला आहे. मी जर स्वार्थासाठी राजकारण सोडलं तर मला माफ केलं जाणार नाही असं ओमराजे यावेळी म्हटले आहेत.

कार्यकर्ते संतप्त 

धाराशिव जिल्ह्यात यावेळी कार्यकर्ते संतप्त झाल्याचं दिसून आलं आहे. एकदा आमदार आणि दोनदा खासदार केलेल्या उद्धव साहेबांना सोडल्यास हा निर्णय वेदनादायी असेल असं कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं आहे. ओमराजे जर फुटले तर त्यांच्या तोंडाला शेण लावू असा इशारा स्थानिक नेत्यांनी दिला आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक