पुण्यात झाला गारांचा पाऊस, मनाली-स्वित्झर्लंडचा नागरिकांनी घरी बसून घेतला आनंद

Published : Apr 22, 2026, 07:22 PM IST
HAILSTORM

सार

पुण्यात प्रचंड उकाड्यानंतर अवकाळी पावसाने गारांसह हजेरी लावली, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार हा पाऊस झाला असून, प्रशासनाने पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुण्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना या गारांसह आलेल्या पावसामुळे काहीसा आराम मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने आधीच राज्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवली होती. 20 ते 24 एप्रिल दरम्यान हा बदलता हवामानाचा अंदाज जाहीर करण्यात आला होता आणि त्यानुसार पुण्यासह अनेक भागांत पावसाची नोंद झाली.

गारांचा झाला वर्षाव 

पुण्यात काही भागांत टपोऱ्या गारांचा वर्षाव झाला. अनेक नागरिकांनी हातात गार घेत आनंद व्यक्त केला, तर काहींनी या अनोख्या हवामानाचा अनुभव घेत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. उष्माघाताचा धोका वाढला होता, त्यामुळे अचानक पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना दिलासा मिळाला.

सतर्कतेचा देण्यात आला इशारा 

दरम्यान, प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे या भागांत पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे एकीकडे उकाड्यापासून आराम मिळाला असला तरी दुसरीकडे शेती आणि दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामानातील बदलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Pune Cab Dispute : पुण्यात आयटी तरुणीचा ३०० रुपये कॅब भाडं देण्यास नकार, ड्रायव्हरला दिली पोलिसांची धमकी
Wardha Doctor Slapped : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरच्या कानशिलात लगावली, CCTV व्हिडिओ व्हायरल