उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास, दोघांमधील संवाद व्हायरल

Published : Jun 26, 2026, 08:41 PM IST
uddhav tahckeray and devendra fadnavis

सार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला, ज्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावेळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे देखील उपस्थित होते. 

सध्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला असल्याची माहिती समजली. यावेळी फडणवीस आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाली. त्या दोघांचे विमानातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

विमानात कोण होत सोबत? 

यावेळी विमानात आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे उपस्थित असल्याचं दिसून आलं. राज्यात सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सोबत प्रवास केला. आपण भेटलो हीच मोठी बातमी असल्याचं फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलयं.

दोघांनी केली एकमेकांची विचारपूस 

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांची विचारपूस केली. यावेळी फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात वितुष्ट आलं. खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे हे यवतमाळ आणि वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्या दोघांची भेट मात्र चर्चेची ठरली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

LIVE: अयोध्या राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर | प्रकल्प प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांची विशेष मुलाखत | राजेश कालरा
Ketan Agarwal Case : विग लावायचा, पण कधीही लपवलं नाही; दोषींना फाशी व्हावी, केतनच्या वडिलांची मागणी