IAS पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत केली तहकूब

पटियाला हाऊस कोर्टात IAS पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणात नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. खेडकर यांच्या वकिलांनी प्रकरणात संरक्षणाची मागणी केली आहे.

vivek panmand | Published : Jul 30, 2024 9:51 AM IST

पटियाला हाऊस कोर्टात प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या खटल्यात नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे या खटल्याची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात यावी, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

पूजा खेडकर यांच्या वकिलांनी सांगितले - 
पूजाच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात त्यांना दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, त्यामुळे त्या संरक्षणाची मागणी करत आहे. पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पटियाला हाऊस कोर्टात पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर उद्या सकाळी १० वाजता सुनावणी होणार आहे.

पूजा खेडकर यांचे प्रकरण काय आहे? - 
पूजा खेडकर यांचे प्रकरण एका ट्विटमुळे जगाच्या समोर आले. या ट्विटमध्ये वैभव कोकाट या युझरने पूजा खेडकर यांचे कारनामे सांगितले आणि त्यानंतर न्यूजमध्ये त्यांना सगळ्यांनीच कव्हर केले. पूजा खेडकर यांनी सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देणे, गाडीवर लाल दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिणे, नॉन क्रिमिलियर चुकीच्या मार्गाने काढणे आणि खोटे अपंगत्व सर्टिफिकेट अशा अनेक कृत्यांमुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली आहे. 

Share this article