एफडीएने तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात टाकली धाड, किती कोटींचा मिळाला माल?

vivek panmand   | CMS
Published : Jul 28, 2026, 10:28 PM IST
tukaram munde

सार

अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगरमध्ये एका गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तीन भावांच्या घरातून ३० लाखांपेक्षा जास्त किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि विविध ब्रँडचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये धाड टाकली आहे. एफडीएच्या डिपार्टमेंटला तीन भावांकडे गुटख्याचा माल असल्याची टिप्स मिळाली होती. एका बातमीदाराकडून याबाबतची माहिती मिळाली होती. आरोपी हा बेसावध असताना एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. ३० लाखांपेक्षा जास्त प्रतिबंधित गुटखा या कारवाईत जप्त करण्यात आलं आहे.

मध्यरात्री केली धडक कारवाई 

छत्रपती संभाजीनगर या भागात धडक एक मोठी कारवाई केली होती. मोती कारंजा आणि मोंढा परिसरात दोन पथके धाड टाकायला गेले होते. त्या धाडीमध्ये तब्बल ३० लाख २९ हजार ४९३ रुपयांचा गुटख्याचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींच्या घराची घेण्यात आली झडती 

एफडीएच्या पथकाने सय्यद वाजेद सय्यद फारुख, सय्यद माजेद सय्यद फारुख आणि सय्यद साजेद सय्यद फारुख या तीन भावांच्या घराची तपासणी केली. यावेळी त्यांच्या घरी रजनीगंधा, गोवा, बाजीराव, आरएमडी, विमल, डायरेक्टर, व्ही-१, मस्तानी सुगंधित तंबाखू, पानपराग आणि राजनिवास अशा ब्रँडचा माल सापडला.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक