Thane Viral Video : स्वच्छतेचा सल्ला देणाऱ्या वृद्ध व्यक्तीला मारहाण; टॅक्सी चालकाच्या विरोधात FIR दाखल

Published : Jun 11, 2026, 11:18 AM IST
Thane Viral Video

सार

Thane Viral Video : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना ठाण्यात एका वृद्ध व्यक्तीला बायकोसमोर मारहाण करणाऱ्या टॅक्सी चालकाला दणका देण्याचे निर्देश दिले. यानंतर टॅक्सी चालकावर कारवाई करत त्याच्या विरोधात पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Thane Viral Video : ठाण्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीला बायकोसमोर मारहाण करण्यात येत असल्याचा एक व्हिडीओ सोशल माीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृद्ध व्यक्तीला मारहाण करणाऱ्या टॅक्सी चालकाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. सदर घटना, १० जूनची असून ज्युपिटर रुग्णालयाच्याजवळ घडली. ज्यावेळी वृद्ध व्यक्तीने टॅक्सी चालकाला रस्त्यावर न थुंकवण्याबद्दल सल्ला दिला. ही घटना घडल्याच्या १४ तासानंतर या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे आणि वर्तक नगर पोलिसांना दिलेल्या निर्देशनामुळे आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ आणि कलम ३५२ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.

नक्की काय आहे प्रकरण? 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी एक वृद्ध व्यक्तीने रस्त्यावर थुंकणाऱ्या टॅक्सी चालकाला तसे करण्यापासून रोखले. यामुळे नाराज झालेल्या चालकाने टॅक्सीमधून खाली उतरत वृद्ध व्यक्तीला त्याच्या पत्नीसमोरच मारहाण करण्यास सुरुवात केली. याशिवाय घटनेवेळी टॅक्सी चालक वृद्धाला दगड उचलून मारण्याचादेखील प्रयत्न करत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सदर घटना घडत असताना वृद्धाची पत्नी आणि अन्य काहीजण टॅक्सी चालकाला हल्ला करण्यापासून रोखत असल्याचेही दिसत आहे. या प्रकरणात वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला असून पाय फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले जात आहे.

 

 

शिवसैनिकांकडून आरोपी ताब्यात

 घटनेनंतर स्थानिक शिवसैनिकांनी आरोपी टॅक्सी चालकाचा शोध घेत त्याला ताब्यात घेत वर्तक नगर पोलिसांकडे देत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणात शिवसैनिक नितेश पाटोळे यांनी स्वत: पोलिसांकडे तक्रार केली. खरंतर, वृद्ध दांपत्य आरोपीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसात गेले नाहीत.

एकनाथ शिंदे यांची दखल

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: घटनेबद्दल दखल घेतली आणि ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे या आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शिंदे यांनी म्हटले की, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांच्या विरोधात सल्ला देणाऱ्या नागरिकावर अशा प्रकारचा हल्ला करणे सहन केले जाणार नाही. पोलिसांनी आता आरोपी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Drought : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; मदतीसाठी सरकारची तयारी सुरू
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका