"देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत!", ठाकरे गटाकडून ठाण्यात नितेश राणेंना डिवचणारे बॅनर्स लावले

Published : Jun 11, 2025, 08:54 AM IST
Thane Banners

सार

नितेश राणेंना डिवचणारे बॅनर्स ठाण्यात झळकवण्यात आले आहेत. खरंतर, देवेंद्र फडवणीस हे माझे बाप नाहीत असा आशय बॅनरवर लिहिण्यात आला आहे. यामुळे राणे पिता-पुत्र काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे. 

Maharashtra Politics : महायुतीतील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले असून नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भाजप हा महायुतीतील "सगळ्यांचा बाप" असल्याचे विधान नितेश राणे यांनी धाराशिव येथील सभेत केले होते. यावरून शिंदे गटातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार केली.

ठाकरे गटाने या प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यात "देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत!" असा मजकूर असलेले बॅनर्स झळकले आहेत. या बॅनर्समधून ठाकरे गटाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ यांनी नितेश राणे यांना थेट टोला लगावला. बॅनरमध्ये त्यांनी स्वतःचा आणि वडिलांचा उल्लेख करत स्पष्टपणे फडणवीस हे आपले 'बाप' नसल्याचे जाहीर केले.

या बॅनर्समुळे ठाकरे गटाने राणे पिता-पुत्रांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला असून, आता यावर नितेश किंवा नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, फडणवीस यांनी देखील नितेश राणेंना या वक्तव्याबाबत समज दिली असून, "राजकारणात परसेप्शन महत्त्वाचं असतं", असे म्हणत त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, मनसेने देखील या वादात उडी घेत राणे पिता-पुत्रांना इशारा दिला आहे. नारायण राणेंनी मनसे नेते प्रकाश महाजनांवर टीका केल्यानंतर यशवंत किल्लेदार यांनी थेट उत्तर दिले आहे. “बोलघेवड्या पुत्राला आवर घाला आणि महाराष्ट्र सैनिकांना धमकावण्याचा प्रयत्न करू नका,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.या साऱ्या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत वाद अधिकच उफाळून येण्याची चिन्हं असून, राणे कुटुंबीयांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

ST Bus Fare Hike : प्रवाशांना महागात बसणार एसटीचा प्रवास! लालपरीपासून शिवनेरीपर्यंत वाढले तिकीट दर
पुणे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० दिवसांचा ‘मेगाब्लॉक’; अमरावती-नागपूरसह ११ गाड्या रद्द