Success Story of Mala Papalkar : जन्मापासून नेत्रहीन, कचऱ्यात फेकून दिलेली माला MPSC उत्तीर्ण, वाचा संघर्षात्मक कथा

Published : Apr 22, 2025, 12:40 PM ISTUpdated : Apr 22, 2025, 12:47 PM IST
Mala Papalkar

सार

Success Story of Mala Papalkar : 25 वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकातील कचरा डब्यातून जीव वाचवलेल्या माला पापळकरने आयुष्यात अनेक संघर्षाचा सामना केला. पण आता एपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आयुष्याची नवी कथा तिने लिहिली आहे.

Success Story of Mala Papalkar : महाराष्ट्रातील जळगाव रेल्वे स्थानकात 25 वर्षांपूर्वी एका नेत्रहीन मुलीला कचरा डब्यात फेकून देण्यात आले होते. याच मुलीचा जीव पोलिसांनी वाचवला आणि तिला सुधार गृहात पाठवले. याच मुलीने आज महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत आयुष्याची नवी कथा लिहिली आहे. माला पापळकर असे तिचे नाव असून तिला आता नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू करण्यात आले आहे. कामाचे नियुक्ती पत्र अलीकडेच मालाला देण्यात आले आहे. वाचा माला पापळकर हिची संघर्षात्मक कहाणी सविस्तर...

माला नागपुर जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या पहिल्या पोस्टिंगसाठी तयार आहे. माला पापळकरने गेल्या वर्षात मे महिन्यात महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC)ची क्लर्क-कम-टाइपिस्ट परीक्षा (ग्रुप सी) उत्तीर्ण झाली. यानंतरच माला चर्चेत आली होती. तीन दिवसांपूर्वी 26 वर्षीय मालाला नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. पुढच्या आठवड्याभरात माला कामावर रुजू होण्याची शक्यता आहे.

कचरा डबा ते यशस्वी आयुष्य

जळगाव रेल्वे स्थानकात नवजात बाळ असतानाच दृष्टिहीन असणाऱ्या माला पापळकरला नागपुर जिल्हा मॅजिस्ट्रेट कार्यालयात शासकीय नोकरी मिळाली आहे. रेल्वे स्थानकात एका कचरा डब्यामध्ये नवजात बाळ असताना ती सापडली होती. यानंतर तिला स्थानिक अनाथाश्रमात नेण्यात आले. जन्मापासून अंध असणाऱ्या मालाने कधीच आपल्यामधील ही उणीव आयुष्यात भासू दिली नाही. मालाने नेहमीच अभ्यासाकडे लक्ष दिले आणि आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. मालाच्या संघर्षाची कथा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.

आई-वडिलांशिवाय वाढली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमरावती येथे राहणारी माला पापळकरने वजार येथील स्वर्गीय अंबादास पंत वैद्य अनाथालयमध्ये राहून ही परीक्षा दिली होती. आपल्या आई-वडिलांबद्दल न माहिती असताना जवळजवळ 150 अनाथ आणि मानसिक रुपात मंद मुलांसोबत वाढली आणि यशाच्या शिखरावर आज पोहोचली गेली.पोलिसांनी मालाच्या आई-वडिलांचा शोध घेतला. पण ते सापडले नाहीत. दरम्यान, जळगावमध्ये विकलांगांच्या पुर्नवसनासाठी कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे जळगाव पोलिसांनी तिला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार स्वर्गीय अंबादास पंत वैद्य अनाथालयाचे निर्देशक शंकर बाबा पापळकर यांच्याकडे दिले.

कोठून केले शिक्षण?

गेल्या वर्षी पद्मश्रीने सन्मानित शंकर बाबा पापळकर यांनी तिची जबाबदारी स्विकारली आणि माला असे तिचे नाव ठेवले. त्यांनी मालाच्या शिक्षणाची काळजी घेतली. मालाला बालपणापासूनच पुस्तके वाचणे आणि शिकण्याची आवड होती. तिने दृढ निश्चय आणि मेहनतीसोबत शिक्षण सुरू ठेवले. डॉ. नरेंद्र भिवापुरकर अंध विद्यालय, अमरावती येथून 10 वी आणि 12 वी परीक्षा उत्तीर्ण झाली. यानंतर माला विदर्भातील ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथून कलेच्या पदवीची परीक्षा पास झाली. यानंतर मालाने पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्रीही मिळवली.

PREV

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!