अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी राज्य मंत्रीमंडळाची आज विशेष बैठक

Published : May 06, 2025, 09:44 AM ISTUpdated : May 06, 2025, 12:56 PM IST
Mantralaya

सार

Cabinate Meeting Today : अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे मंगळवारी (06 मे) राज्य मंत्रीमंडळाची विशेष बैठक पार पडणार आहे.

Cabinate Meeting Today : अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे मंगळवारी (06 मे) राज्य मंत्रीमंडळाची विशेष बैठक पार पडणार आहे. या बैठकीत परिसराचा कायापालट करण्यासह धनगर सामाजाच्या विकासाच्या प्रश्नांवर तोडगा काढला जाणार आहे अशी चर्चा आहे.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राज्य मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. चौंडी गावात नागरिकांना मुबलक सुख-सुविधांचा लाभ घेता येत नाही. तरीही देखील राज्य मंत्रीमंडळाची सभा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय बैठकीमध्ये नाशिकमधील कुंभमेळा प्राधिकर, अहिल्याबाईंच्या जीवनावर सर्व भाषांमध्ये सिनेमा, वैद्यकीय महाविद्यालय या काही गोष्टींवरुन निर्णय घेतला जाऊ शकतो.

धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव मंजूर करण्यासह केंद्र सरकारला पाठवावा. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबद्दल बारामतीपासून नागपूरपर्यंत दिलेली आश्वासाने समाज विसरलेला नाही. यासंदर्भातील अभ्यास आधीच झाला असून निर्णय होणे बाकी असल्याचे धनगर समाजाचे नेते विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे.

PREV

Recommended Stories

Pandharpur–Tirupati Railway : पंढरपूर ते तिरुपती, थेट दर्शनासाठी विशेष रेल्वे! संपूर्ण वेळापत्रक लगेच पाहा!
‘आवडेल तिथे प्रवास’ आता आणखी स्वस्त! एसटी महामंडळाकडून पास दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर