ST Employees Diwali Bonus 2025: राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी ₹6,000 बोनस, ₹12,500 सण उचल जाहीर केली. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी अधिक गोड होणार आहे! कारण राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच मोठा दिलासा देत ₹6,000 चा बोनस आणि ₹12,500 ची सण उचल जाहीर केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कामगार संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
26
काय मिळणार ST कर्मचाऱ्यांना?
₹6,000 दिवाळी बोनस
₹12,500 सण उचल रक्कम
सरासरी ₹7,500 वेतनवाढीचा फरक हप्ता (प्रति महिना)
ही रक्कम दिवाळीपूर्वीच थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
36
आंदोलनाचा परिणाम?
एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. काही संघटनांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुद्धा सुरू केलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बैठक घेत काही महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या.
सरकारने स्पष्ट केलं आहे की, आर्थिक परिस्थिती काहीशी ताणलेली असली तरी, उर्वरित मागण्या लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
56
कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया, "कही खुशी, कही गम"
जरी बोनस आणि सण उचल जाहीर झाली असली, तरी काही कर्मचाऱ्यांनी ₹6,000 बोनस अपुरा वाटल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे कर्मचारीवर्गात संमिश्र भावना आहेत.
66
ST कर्मचाऱ्यांना दिलासा
राज्य सरकारने दिवाळीपूर्वी काही महत्त्वाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत ST कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. बोनस आणि सण उचलमुळे कर्मचाऱ्यांचा सण सुखकर होण्यास मदत होईल. आता उर्वरित मागण्या पूर्ण होण्याचीही आशा कर्मचाऱ्यांना आहे.