Ration Update News: रेशनकार्डधारकांसाठी दिवाळी धमाका! आता गहू-तांदळासोबत मोफत मिळणार ज्वारी, जाणून घ्या वाटप कधी सुरू होणार?

Published : Oct 13, 2025, 04:55 PM IST

Ration Update News: राज्यातील रेशन कार्डधारकांना नोव्हेंबर २०२५ पासून दोन महिन्यांसाठी मोफत ज्वारी मिळणार आहे. गहू आणि तांदळाऐवजी आता लाभार्थ्यांना प्रत्येकी एक किलो गहू आणि ज्वारी दिली जाईल. ज्वारीच्या भरघोस उत्पादनामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

PREV
15
रेशनकार्डधारकांना रेशनवर मिळणार मोफत ज्वारी

पुणे: राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. यंदा ज्वारीच्या भरघोस उत्पादनानंतर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी केली आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर 2025 पासून पुढील दोन महिन्यांसाठी, शिधावाटप दुकानांमधून लाभार्थ्यांना गहू आणि ज्वारी प्रत्येकी एक किलो या प्रमाणात मोफत वितरित करण्यात येणार आहे.

25
कोणत्या जिल्ह्यांना किती ज्वारी मिळणार?

पुणे शहर – 1,374 टन

पुणे जिल्हा – 2,844 टन

एकूण – 4,218 टन ज्वारी आवश्यक

याशिवाय, सातारा, सांगली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, लातूर आणि सोलापूर (शहर व जिल्हा) अशा 12 जिल्ह्यांसाठी 22,766 टन ज्वारी लागणार आहे. तर, हिंगोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी 4,013 हेक्टर क्षेत्रात लागवड अपेक्षित आहे. 

35
धान्य उचल व वितरण प्रक्रिया कशी होणार?

बुलढाणा येथून – पुणे आणि इतर 11 जिल्ह्यांसाठी ज्वारीचा पुरवठा

अकोला येथून – हिंगोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ज्वारी उचल

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबत संपूर्ण नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

45
आतापर्यंत काय मिळत होतं आणि आता काय बदल?

याआधी लाभार्थ्यांना गहू आणि तांदूळ मोफत दिले जात होते.

आता नोव्हेंबर 2025 पासून लाभार्थ्यांना मिळणार आहे.

गहू – 1 किलो

ज्वारी – 1 किलो 

55
शेतीप्रधान राज्यात ‘ज्वारी’चा आदरपूर्वक वापर सुरू!

राज्यात वाढलेलं ज्वारी उत्पादन आणि त्याच्या वापराला चालना देण्यासाठी घेतलेला हा निर्णय शेतकरी, लाभार्थी आणि अन्नसुरक्षा योजनेतील सर्व घटकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories