ST Bus Big Update: एसटी महामंडळ २०३५ पर्यंत सर्व १४,००० बसेस इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करणार आहे. प्रदूषण, डिझेल खर्चावर मात करण्याच्या या योजनेत सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारणे, प्रवाशांना प्रदूषणमुक्त प्रवास देणे समाविष्ट आहे.
आता लालपरी नाही सोडणार धूर! २०२५ पर्यंत सर्व १४ हजार गाड्या होणार 'इलेक्ट्रिक'
मुंबई: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाणारी 'लालपरी' आता कात टाकणार आहे. वाढते प्रदूषण आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींवर मात करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (ST) एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. येत्या २०३५ पर्यंत एसटीच्या ताफ्यातील सर्व १४,००० बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक केल्या जातील, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली.
25
प्रदूषणातून सुटका, खर्चात होणार मोठी बचत
नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना सरनाईक यांनी स्पष्ट केले की, एसटीला 'हरित ऊर्जे'ची जोड देणे ही काळाची गरज आहे. या निर्णयाचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे असतील.
पर्यावरण रक्षण: डिझेलचा धूर बंद झाल्यामुळे प्रदूषणात मोठी घट होईल.
आर्थिक सुधारणा: इंधन आणि देखभालीचा (Maintenance) खर्च कमी झाल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल.
आधुनिक प्रवास: प्रवाशांना आवाजमुक्त आणि प्रदूषणरहित प्रवासाचा अनुभव मिळेल.
35
चार्जिंग स्टेशन्सचे जाळे आणि सौर ऊर्जेचा वापर
केवळ बसेस बदलून सरकार थांबणार नाही, तर त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधाही उभारल्या जाणार आहेत.
दर २५ किमीवर सोय: राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर दर २५ किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील.
सौर ऊर्जेला प्राधान्य: ही चार्जिंग स्टेशन्स चालवण्यासाठी प्रामुख्याने सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.
सामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी, टोल माफी आणि कर सवलत!
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी सरकारने नागरिकांनाही मोठे प्रोत्साहन दिले आहे. जे नागरिक स्वतःसाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतील, त्यांना विशेष कर सवलती (Tax Rebates) दिल्या जातील.
प्रवासात टोल माफी (Toll Exemption) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही विचाराधीन आहे.
55
'इलेक्ट्रिक क्रांती'मुळे एसटीचा चेहरामोहरा बदलणार
डिझेलमुक्त एसटीमुळे राज्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. इंधन दरवाढीच्या संकटामुळे डबघाईला आलेल्या महामंडळाला या 'इलेक्ट्रिक क्रांती'मुळे नवसंजीवनी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.