मोजक्या १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या १० वीचा निकाल, मुंबईचा तिसरा, पुण्याचा चौथा क्रमांक

Published : May 13, 2025, 02:26 PM ISTUpdated : May 13, 2025, 03:01 PM IST
Government School Students

सार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज जाहीर केलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल हा ९४.१०% एवढा लागला आहे

 मुंबई - दहावीचा निकाल हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज जाहीर केलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल हा ९४.१०% एवढा लागला आहे, जो निश्चितच समाधानकारक आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, यंदाचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. संपूर्ण राज्यातून नऊ विभागीय मंडळांतून तब्बल १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १४ लाख ८७ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय आकडेवारी

या वर्षी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून १५ लाख ५८ हजार २० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला आणि १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याशिवाय २८ हजार ५१२ खासगी व २४ हजार ३७६ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

एकंदर निकाल आणि यशाचे प्रमाण

सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण १६,१०,९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,९८,५५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यातील १४,८७,३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची एकूण टक्केवारी ९३.०४ टक्के इतकी आहे.

मुला-मुलींच्या निकालात मोठा फरक

यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४% इतकी असून मुलांची टक्केवारी ९२.३१% आहे. म्हणजेच मुलींची कामगिरी मुलांपेक्षा ३.८३ टक्क्यांनी सरस ठरली आहे.

विभागनिहाय निकाल (सर्वाधिक ते सर्वात कमी)

विभागउत्तीर्णतेची टक्केवारी
कोकण विभाग९८.८२%
कोल्हापूर विभाग९७.४५%
मुंबई विभाग९५.८४%
पुणे विभाग९४.८१%
नाशिक विभाग९३.०४%
अमरावती विभाग९२.९५%
छ. संभाजी नगर९२.८२%
लातूर विभाग९२.७७%
नागपूर विभाग९०.७८%

एकूण निकाल व परीक्षार्थी माहिती

१) नववी विभागीय मंडळांतील नियमित विद्यार्थी:

नोंदणी: 15,58,020

परीक्षार्थी: 15,46,579

उत्तीर्ण: 14,55,433

उत्तीर्णतेची टक्केवारी: 94.10%

२) खाजगी विद्यार्थी:

नोंदणी: 28,512

परीक्षार्थी: 28,020

उत्तीर्ण: 22,518

उत्तीर्णतेची टक्केवारी: 80.36%

३) पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी:

नोंदणी: 24,376

परीक्षार्थी: 23,954

उत्तीर्ण: 9,448

उत्तीर्णतेची टक्केवारी: 39.44%

४) एकूण (सर्व विद्यार्थी):

नोंदणी: 16,10,908

परीक्षार्थी: 15,98,553

उत्तीर्ण: 14,87,399

एकूण टक्केवारी: 93.04%

५) दिव्यांग विद्यार्थी:

नोंदणी: 9,673

परीक्षार्थी: 9,585

उत्तीर्ण: 8,844

टक्केवारी: 92.27%

६) विभागीय निकाल तुलनात्मक विश्लेषण (नियमित विद्यार्थी)

सर्वाधिक निकाल: कोकण विभाग - 98.82%

सर्वात कमी निकाल: नागपूर विभाग - 90.78%

७) लिंगनिहाय यशाचे प्रमाण

मुली: 96.14%

मुले: 92.31%

फरक: मुलींचे यश 3.83% ने अधिक

८) परीक्षेचे एकूण विषय व यश

एकूण विषय: 62

100% निकाल लागलेले विषय: 24

९ ) गुणानुसार श्रेणी विभाजन (नियमित उत्तीर्ण विद्यार्थी)

प्राविण्यासह प्रथम श्रेणी: 4,88,745

प्रथम श्रेणी: 4,97,277

द्वितीय श्रेणी: 3,60,630

उत्तीर्ण श्रेणी: 1,08,781

शाळा व 100% निकाल

एकूण शाळा: 23,489

100% निकाल लागलेल्या शाळा: 7,924

१० ) निकालातील वर्षानुसार फरक

मार्च 2024 निकाल: 95.81%

फेब्रु.-मार्च 2025 निकाल: 94.10%

घट: 1.71%

2025 मध्ये 10वीचा निकाल तुलनेने थोडा घटलेला असला तरी एकंदर यशदर 93% पेक्षा अधिक असून, मुलींचा निकाल मुलांपेक्षा लक्षणीय चांगला आहे. कोकण विभागाने सर्वाधिक निकाल मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर नागपूर विभागात सुधारण्याची गरज आहे.

PREV

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!