
कोल्हापूर: कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सहा नृत्यांगनांनी हाताच्या नासा कापून कापण्याचा प्रयत्न केला. दोन महिन्यांनी घडलेल्या या प्रकरणामुळे नृत्यांगना सुधारगृहात असल्याची माहिती समजली आहे. सुधारगृहात हा प्रकार घडल्यामुळं सगळीकडं एकच खळबळ उडाली आहे.
या महिलांवर पोलिसांनी कारवाई केल्याचं सांगण्यात आलं आहे. आक्षेपार्ह हालचाली आणि हावभाव केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून सुधारगृहात ठेवलं होतं. दोन महिने पूर्ण झाल्यानंतर या महिलांनी प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या हातावर ब्लेडने वार करून नस कापली.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून हे कशामुळे झालं याचा उलगडा लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. या सर्वांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी का जीव देण्याचा प्रयत्न केला हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाही. अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यावर कारवाई करण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे.