वैष्णवी हगवणे प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर, जाव मयुरीचा छळ केल्याचा आरोप

Published : May 25, 2025, 06:56 AM ISTUpdated : May 25, 2025, 08:53 AM IST
mayuri and vaishnavi hagwane

सार

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरच्या पाच सदस्यांसह पतीला अटक झाली असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोपांसह मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला आहे. 

पुणे — वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैष्णवीच्या पतीसह सासरच्या पाच सदस्यांना अटक करण्यात आली आहे. तथापि, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात आणखी गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला आहे.

दमानिया यांनी हगवणे कुटुंबावर वैष्णवीची दुसरी जाव मयुरी जगताप हिच्या छळाचे आरोप केले. त्यांनी सांगितले की, मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात राजेंद्र हगवणे यांनी मयुरीला कानशिलात मारल्याचे आणि तिचे कपडे फाडल्याचे नमूद केले आहे. दमानिया यांनी हगवणे कुटुंबाला "लोभी आणि विकृत" असे संबोधून, त्यांना राजकीय संरक्षण असल्याचा आरोप केला. त्यांनी जालिंदर सुपेकर यांचे नाव घेतले असून त्यांनी हगवणे कुटुंबाला मदत केल्याचा दावा केला आहे.

या प्रकरणात वैष्णवीच्या सासऱ्याने ५१ किलो सोनं बँकेत गहाण ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, वैष्णवीच्या मृत्यूपूर्वीच्या घटनांचा तपास करताना तिच्या पतीने तिला लोखंडी पाइपने मारहाण केल्याचे आणि २०२३ मध्ये तिने उंदीर मारण्याचे औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे . या प्रकरणात पोलिसांनी १२ साक्षीदारांचे जबाब, रुग्णालयाचे रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. राजेंद्र आणि सुशील हगवणे हे सात दिवस फरार होते, परंतु त्यांना स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली आहे .

या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते अजित पवारांकडे तक्रार घेऊन गेले आहेत. अंजली दमानिया यांच्या या गौप्यस्फोटामुळे वैष्णवी हगवणे प्रकरणात नवीन वळण येण्याची शक्यता आहे. राजकीय संरक्षण, पोलिसांची भूमिका आणि महिला आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Satbara Utara : सातबारा उताऱ्यात या नोंदी दिसल्या तर सावध! जमीन जप्तीपासून कारवाईपर्यंत मोठे परिणाम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
जमीन वापर नियमांत ऐतिहासिक बदल! ‘सनद’ची अनिवार्यता रद्द; नागरिक–बिल्डर्स–जमीनधारकांना मोठा दिलासा