लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा गट काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलयही करतील असे विधान केले आहे. 

Chanda Mandavkar | Published : May 8, 2024 5:31 AM IST / Updated: May 08 2024, 11:11 AM IST

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकरणातील सर्वाधिक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षासंदर्भात एक मोठे विधान केले आहे. शरद पवार यांनी वर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष (Regional Parties) भविष्यात काँग्रेसजवळ येतील आणि काही विलिनही करतील असे म्हटले आहे. अशातच आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेसमध्ये काही प्रादेशिक पक्षाचे विलय होईल
शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत असे विधान केलेयं की, पुढील काही वर्षांमध्ये प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक जवळ येतील. अथवा काँग्रेससोबत विलिन होण्याचा विचार करू शकतात. याबद्दल पक्षाला योग्य वाटत असल्यास तसे होऊ शकते.

शरद पवारांनी पुढे म्हटले की, "मला काँग्रेस आणि आमच्यामध्ये काही फरक आहे असे वाटत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू यांच्या विचारसणींचे आहोत. दरम्यान, मी सध्या काहीही करत नाहीये. कोणताही मोठा निर्णय सामूहिक रुपात घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे कठीण आहे."

उद्धव ठाकरे यांचे कौतुक
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाबद्दल बोलताना शरद पवारानी म्हटले की, "उद्धव ठाकरेही सोबत मिळून काम करण्यासाठी सकारात्मक आहेत. मला उद्धव ठाकरेंचे विचार माहितेयत आणि ते आमच्यासारखेच आहेत. महाराष्ट्रात सुरू असलेल्या निवडणुकीत सत्तारुढ युतीच्या विरोधात एक अंडरकरंटचा अनुभव येतोय. उत्तर प्रदेशासारख्या देशातील काही अन्य ठिकाणी हिच स्थिती आहे."

शरद पवारांनी निवडणुकीवरून केले हे विधान
वर्ष 2024 च्या निवडणुकीची तुलना याआधीच्या निवडणुकांसोबत करत शरद पवारांनी म्हटले की, राजकीय पक्षांमधील एक मोठा वर्ग भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंत करत नाही. देशाचा मूड मोदींच्या विरोधात होत आहे. आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारांचे पालन करत सकारात्मक दिशेने पुढे जात आहोत.

आणखी वाचा : 

धाराशिवमध्ये मतदानाला गालबोट, शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला केल्याने मृत्यू

Lok Sabha Election 2024 : शरद पवार उद्धव ठाकरेंना बाहेर थांबा म्हणाले ? नेमकं व्हिडिओमध्ये काय ?

Read more Articles on
Share this article