Operation Sindoor चे श्रेय फक्त भारतीय सेनेचेच, संजय राऊतांनी केंद्रावर साधला निशाणा

Published : May 07, 2025, 12:39 PM ISTUpdated : May 07, 2025, 01:22 PM IST
Sanjay Raut

सार

Sanjay Raut on Operation Sindoor : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील 9 दहशतवाद्यांचे गड उधळून लावले आहेत.यावर खासदार संजय राऊत यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया देण्यासह केंद्रावरही टीका केली आहे.

Sanjay Raut on Operation Sindoor : 22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून 26 निर्दोष नागरिकांचा जीव घेतला गेला. यावर भारताने या हल्ल्याचे परिणाम भोगण्यास तयार रहा असा इशारा दिला होता. याशिवाय पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणावही वाढला गेला. अखेर बुधवारी (07 मे) मध्यरात्री भारतीय वायुसैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. यामध्ये 9 दहशतवाद्यांचे मुख्य ठिकाणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.

ऑपरेशन सिंदूरवर आता सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया सामान्य नागरिक ते राजकीय नेत्यांकडून दिल्या जात आहेत. अशातच उद्धव ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले आहेच. पण केंद्र सरकारवरही टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी पत्रकारांसोबत बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. यापुढे राऊत म्हणाले की, जे आता कोणी बोलत आहेत ते सीमेवर बंदुक घेऊन उभे राहिलेले नाहीत. अथवा क्षेपणस्र डागण्यासाठी लाहोरला गेलेले नाहीत. बहुतांश ठिकाणी सायरन बिघडले गेल्याची माहिती माझ्याकडे आहे. युद्ध सरावाची गरज नाही. खरंतर, भारतीय जनता मानसिकदृष्ट्या सक्षम असून त्यांनी तीन युद्धे पाहिले आहेत. याशिवाय राऊत म्हणाले की, हे श्रेय भारतीय सेनेचे आहे. यामुळे त्यांना ते मिळावे."

PREV

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!