
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला ५ खासदार अनुपस्थिती राहिले होते. शिंदे गटाच्या केंद्रीय मंत्र्याची भेट घेतल्यामुळं खासदार संजय देशमुख चर्चेत आले आहेत. त्यांनी या भेटीमागची कल्पना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली होती, अशी माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीला जवळपास ४ खासदार अनुपस्थित होते. हे खासदार शिंदे सेनेत जातात का याकडं राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहील होत. बैठकीला अनुपस्थित राहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. त्यामुळं संजय देशमुख हे चर्चेत आले आहेत.
मतदारसंघातील कामाच्या संदर्भात आपण प्रतापराव जाधव यांची भेट घेतली अशी माहिती खा. संजय देशमुख यांनी दिली आहे. रविवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीला संजय देशमुख यांनी ऑनलाईन उपस्थिती दाखवली होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी जाधव यांची भेट घेतल्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे.
पाच खासदार हे उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहिले होते. रविवारी आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला गैरहजर राहिलेले संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर, मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीलाही गैरहजर होते. मात्र यापैकी फक्त नागेश पाटील हेच ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते असं सांगण्यात आलं आहे.