Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मारुती इर्टिगा कारमध्ये लोखंडी ग्रील घुसल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू

Published : Jul 04, 2025, 09:34 AM IST
Samruddhi Mahamarg Accident

सार

वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

Samruddhi Mahamarg Accident : वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला असून, मारुती एर्टिगा कारच्या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना वनोजाजवळ रात्रीच्या सुमारास घडली.

जयस्वाल कुटुंब पुण्याहून उमरेडकडे प्रवास करत असताना, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. भरधाव वेगातील एर्टिगा कार समृद्धी महामार्गाच्या संरक्षक कठड्याला धडकून थेट बाहेर फेकली गेली. अपघात इतका भीषण होता की, महामार्गालगत लावलेली लोखंडी ग्रील थेट कारच्या आत घुसली, ज्यामुळे गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात वैदेही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चालक चेतन जयस्वाल, राधेश्याम जयस्वाल आणि संगीता जयस्वाल हे तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तातडीने वाशिममधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, व जखमींना कारमधून बाहेर काढून रुग्णालयात हलवले. सध्या पोलीस या अपघाताच्या तपासात गुंतले आहेत.

जून महिन्यातही अपघात

समृद्धी महामार्गाच्या टप्प्यावर शहापूर येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. कोळकेवाडी आणि आमने टोलनाका दरम्यान शहापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाशिंद पोलीस हद्दीत आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन वाहनांमध्ये जोरदार धडक होऊन दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. या अपघातात क्रुझर जीप आणि ट्रकचा समावेश असून वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला होता.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या

गेल्या दोन वर्षांत समृद्धी महामार्गावर तब्बल 140 अपघात झाले असून यात 233 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर फक्त 2025 च्या पहिल्या तिमाहीत 45 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!