
Big Boss 19: हिंदीतील बिग बॉसची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते. अभिनेता सलमान खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असल्यामुळं सर्वच प्रेक्षकांचे इकडं डोळे लागलेले असतात. यावर्षी या शोची थीम ही राजनीती राहणार असून यावेळी घरातील बहुतेक नियम बदलून टाकण्यात आले आहेत. शोच्या या पर्वामध्ये एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.
यावेळीच्या बिग बॉसच्या शोमध्ये एक मराठी चेहरा झळकणार असून तो कोण असेल याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. आरजे प्रणित म्हणजे प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे याची यावर्षीच्या बिग बॉस शोमध्ये निवड झाली आहे. सोशल मीडियावर त्याला महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून ओळखलं जात असून त्याचे युट्युबवर अनेक व्हायरल व्हिडीओ उपलब्ध आहेत.
सलमान खानसोबत बोलताना प्रणितने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्याने म्हटलं की, माझे वडील तुमचे खूप मोठे चाहते आहेत. यावेळी भाईजान सलमान खानने प्रणितचे स्वागत मराठीत बोलूनच केलं. त्याने काही वर्षांपूर्वी आरजे म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तो हळूहळू मराठी स्टॅन्डअप कॉमेडीच्या क्षेत्राकडे वळला.
सोशल मीडियावर खासकरून इंस्टाग्राम आणि युट्युबवर त्याचे फॉलोवर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. युट्युबवर त्याच्या जवळपास प्रत्येक व्हिडिओला मिलियन्समध्ये रिच पोहचला आहे. प्रणितने मध्यंतरी वीर पहारिया याच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यामुळं त्याला १० टी १२ जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली होती.