
खासदार सुप्रिया सुळे या कायमच चर्चांमध्ये झळकताना दिसून येतात. त्या आता परत एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं वक्तव्य सुप्रिया यांनी केलं आहे. त्यामुळं त्या परत एकदा विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
पिढ्यानुपिढ्या शुद्ध शाकाहाराची परंपरा जपणाऱ्या आम्हा वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला तुम्ही मांसाहार केलेला चालतो, हे बोलणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करु शकत नाही तर किमान अपमान तरी करु नका. पण मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, अशी कडवट शब्दामध्ये सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
सुप्रिया सुळे यांनी म्हटल्या आहे की, माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असा सवाल त्यांनी विचारला. आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, आम्ही कोणाचे मिंधे नाही. खाल्लं तर काय पाप केलं का?, असा सवाल त्यांनी विचारला. 50 वर्षांपूर्वी शरद पवार एका मुलीवर थांबले. स्वतःचं ऑपरेशन केलं, मात्र पत्नीचे नाही, असं सुप्रिया यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
सुप्रिया यांनी पुढं बोलताना म्हटलं आहे की, सरसकट कर्जमाफी देतो. ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून फक्त राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घ्यायला गेले होते. दहा वेळा आपण वेळ मागतो पण ते वेळ देत नाहीत. त्यामुळं मी वेळ मागणंच बंद केलं आहे. मी ठरवलं ना, माझी काम दिल्लीत होतात असं सुळे यावेळी बोलल्या आहेत.