
१. मराठवाड्यात पावसाने कहर केला असून मागील 24 तासांपासून होणाऱ्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील 420 महसूल मंडळांपैकी 240 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात पावसाने हैदोस घातला असून अर्ध्या मराठवाड्यात अतिवृष्टीची नोंद झाल्याने दाणादाण उडाली आहे. अतिवृष्टीमुळे 3 जणांचा मृत्यू तर 78 जनावरे दगावली आहेत.
१. पुढील चार दिवस विदर्भ आणि मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
२. वाशीम जिल्हात मुसळधार पाऊस झाला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
३. आज महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
४. आज अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बारामती येथे जाणार आहेत, येथे ते उमेदवारी घोषित करणार आहेत.