Ration Card Update : 1 जानेवारीपासून रेशनमध्ये मोठा बदल! कुणाला किती धान्य मिळणार?, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published : Dec 29, 2025, 03:59 PM IST

Ration Card Update : जानेवारीपासून राज्यातील रेशन धान्य वाटपात मोठा बदल होणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ज्वारी वाटप पद्धत बंद करून, आता पुन्हा पारंपरिक पद्धतीने फक्त गहू आणि तांदूळ वितरित केले जाणार आहेत. 

PREV
15
1 जानेवारीपासून रेशनमध्ये मोठा बदल! कुणाला किती धान्य मिळणार?

Ration Card Update : राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी नववर्षाच्या सुरुवातीलाच रेशन धान्य वाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत प्रयोगात्मक स्वरूपात लागू करण्यात आलेली मिश्र धान्यवाटप पद्धत आता रद्द करण्यात येत असून, जानेवारीपासून पुन्हा पारंपरिक रेशन वितरण प्रणाली लागू होणार आहे. 

25
ज्वारीचा प्रयोग संपला, जुन्या पद्धतीकडे परत

मागील दोन महिन्यांत गव्हासोबत ज्वारीचा समावेश करून लाभार्थ्यांना गहू, ज्वारी आणि तांदूळ असा मिश्र धान्यपुरवठा करण्यात आला होता. या कालावधीत अनेक शिधापत्रिकाधारकांना पहिल्यांदाच रेशनवर ज्वारी मिळाली. मात्र काही भागांत ज्वारीच्या वापराबाबत अडचणी निर्माण झाल्याने शासनाने हा प्रयोग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, जानेवारीपासून रेशन दुकानांवर ज्वारीचा पुरवठा बंद होणार असून, लाभार्थ्यांना पुन्हा फक्त गहू आणि तांदूळच दिला जाणार आहे. 

35
मागील दोन महिन्यांत काय बदल होते?

नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील धान्यवाटपात तात्पुरते बदल करण्यात आले होते.

अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना पाच किलो गहू, पाच किलो ज्वारी आणि 25 किलो तांदूळ देण्यात आला होता.

प्राधान्य कुटुंब योजनेत, पूर्वी मिळणाऱ्या दोन किलो गहू व तीन किलो तांदळाऐवजी एक किलो गहू आणि एक किलो ज्वारी देण्यात येत होती. 

45
1 जानेवारीपासून किती धान्य मिळणार?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या मूळ प्रमाणानुसार जानेवारीपासून धान्यवाटप करण्यात येणार आहे.

जानेवारी 2026 पासून

अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना दरमहा

21 किलो गहू + 14 किलो तांदूळ = एकूण 35 किलो धान्य

प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दरमहा

3 किलो गहू + 2 किलो तांदूळ  

55
लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

या बदलामुळे रेशन वितरण पुन्हा स्थिर आणि ओळखीच्या पद्धतीने होणार असून, धान्य वापराबाबत निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories