सावधान! रेशनचे धान्य कायमचे बंद होणार? २.५ लाख लोकांवर टांगती तलवार; यादीतून तुमचे नाव कट होण्यापूर्वी 'हे' काम करा

Published : Jan 24, 2026, 06:32 PM IST

Ration Card : शासनाने रेशन कार्डसाठी ई-केवायसी अनिवार्य केले असून, गोंदिया जिल्ह्यातील २.३७ लाख लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. मुदतीत ई-केवायसी न केल्यास त्यांचे नाव रेशन कार्डमधून कायमचे कापले जाऊन धान्यपुरवठा बंद केला जाईल.

PREV
16
सावधान! रेशनचे धान्य कायमचे बंद होणार? २.५ लाख लोकांवर टांगती तलवार

गोंदिया : रेशन कार्डवर मिळणारे स्वस्त धान्य आता धोक्यात आले आहे! शासनाने रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली असून, गोंदिया जिल्ह्यातील तब्बल २ लाख ३७ हजार लाभार्थ्यांनी अद्याप हे काम पूर्ण केलेले नाही. प्रशासनाने आता कडक पवित्रा घेतला असून, दिलेल्या मुदतीत ई-केवायसी न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे नाव रेशन कार्डमधून कायमचे कापले जाणार आहे. 

26
रेशन का बंद होणार?

सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि 'बोगस' लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ई-केवायसी मोहीम हाती घेतली आहे. रेशन कार्डवर नाव असलेल्या प्रत्येक सदस्याचे आधार प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. जे लोक ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना सरकार आता 'अपात्र' समजणार असून त्यांचे धान्य तातडीने बंद केले जाईल. 

36
गोंदिया जिल्ह्याची सद्यस्थिती

जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार

यशस्वी ई-केवायसी: ९ लाख १३ हजार लाभार्थी.

प्रलंबित लाभार्थी: २ लाख ३७ हजार (ज्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे). 

46
नाव कापले गेल्यास काय होईल?

एकदा नाव रेशन कार्डमधून हटवले गेले की, ते पुन्हा समाविष्ट करण्यासाठी मोठी शासकीय कसरत करावी लागेल. पुन्हा कागदपत्रे गोळा करणे, तहसील कार्यालयात फेऱ्या मारणे असा मोठा मनस्ताप सहन करावा लागेल. हे टाळण्यासाठी आताच पावले उचलणे गरजेचे आहे. 

56
काय करावे लागेल?

प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. रेशन कार्डमधील सर्व सदस्यांना घेऊन आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात (Ration Shop) जा. तिथे 'ई-पॉस' (e-PoS) मशीनवर अंगठा लावून तुम्ही तुमचे आधार प्रमाणीकरण मोफत करू शकता. 

66
प्रशासनाचा इशारा

शासनाने अनेकदा मुदतवाढ देऊनही लाखो लोक अद्याप या प्रक्रियेपासून दूर आहेत. आता ही शेवटची संधी असून, तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी त्वरित रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी पूर्ण करा.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories