मराठवाड्यात पावसाचा इशारा; IMD ने दिला यलो अलर्ट, नागरिकांनी काळजी घेण्याचं केलं अवाहन

Published : Aug 02, 2025, 11:00 AM IST
Heavy Rain In Delhi Causes Waterlogging

सार

मराठवाड्यात आज सकाळपासून आकाश ढगाळलेले असून, IMD ने मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी, तर मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे. सध्या हवामान स्थिर असले तरी उद्या यलो अलर्ट जारी आहे.

मराठवाड्यात आज सकाळपासून आकाश ढगाळलेले असून, IMD ने मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या भागामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. काही भागात पावसाचा अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संततधार पाऊस पडणार 

आगामी २४ तासांत मराठवाड्यासोबतच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे . या काळात वादळी पावसासह विजांचा हादका आणि अतिवृष्टीच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. IMD ने अचानक होणाऱ्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे 

खबरदारीचे दिले संकेत 

मुंबईच्या शहरात लो-लाईंग भाग, नदीकाठीचे भाग आणि रहिवासी विभाग पाण्यात बुडण्याची शक्यता निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना आपल्या परिसराची सुरक्षा आणि संभाव्य धोक्यांना लक्ष देण्याची सूचना केली आहे. या काळात रस्ता वाहतूक, रेल्वे सेवा आणि सार्वजनिक वाहने प्रभावित होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना प्रवास पूर्व नियोजन आणि तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे, ज्यामुळे अचानक आलेल्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागणार नाही.

हवामान स्थिर 

सध्या हवामान स्थिर असून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. उद्या मात्र येलो अलर्ट जारी केला असून काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सर्वांनी योग्य ते नियोजन करावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

कुळाची जमीन खरेदीची किंमत कशी ठरते? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो
मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी 'डोकेदुखी'; सलग 3 दिवस सेवा ठप्प, 14 एक्स्प्रेस रद्द, अनेक गाड्यांना 'मेगा' विलंब!