Pune Water Supply Cut : पुण्यातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Published : Jul 23, 2024, 11:40 AM IST
Water Cut in Mumbai

सार

Pune Water Supply Cut : जलवाहिनीतून होत असलेली गळती थांबवण्याचे काम करण्यासाठी येत्या गुरुवारी शहरातील स्वारगेट आणि परिसरातील भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Pune Water Supply Cut : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. गुरुवारी पुण्यातील स्वारगेट परिसरातील पाणीपुरवठा बंद असणार आहे. जलवाहिनीतून होत असलेली गळती थांबवण्याचे काम करण्यासाठी येत्या गुरुवारी शहरातील स्वारगेट आणि परिसरातील भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना बुधवारी पाणी साठवून ठेवावे लागणार आहे. पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून पाणी गळती थांबविण्यासाठी जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही पेठांसह पूर्व भागामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आहे. दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

'या' भागातील पाणी पुरवठा राहणार बंद

शंकरशेठ रस्ता परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकिज मागील परिसर, पर्वती दर्शनचा काही भाग, मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंदनगर, महर्षीनगरचा काही भाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सराटॉकिज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा 

पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. 600 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी पर्वती जलकेंद्रामधून एमएलआर टाकीवरून भवानी पेठेकडे जाते. त्यातील पाण्याची मोठी नासडी होत आहे. ही पाणीगळती रोखण्यासाठी गुरुवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील काही पेठांसह पूर्व भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशीचा पाणीपुरवठा उशिराने तसेच कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच पुरेसे पाणी भरून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा :

5 ऐतिहासिक अर्थसंकल्प त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला दिला आधार, जाणून घ्या

IAS पूजा खेडकरच्या आईला शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी १४ दिवसांचा तुरुंगवास

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 'या' तारखेला मिळणार, अजित पवार यांनी दिली माहिती

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर