शरद पवारांनी सह्याद्री अतिथीगृहावर घेतली CM शिंदेंची भेट, आरक्षणावर झाली चर्चा?

Published : Jul 22, 2024, 07:19 PM IST
shinde pawar meet

सार

छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेत आरक्षणावरून निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी आपण मध्यस्थी करावी, अशी विनंती पवार यांच्याकडे केली होती.

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शासकीय विश्रामगृह असलेल्या सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये आरक्षण प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेत आरक्षणावरून निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी आपण मध्यस्थी करावी, अशी विनंती पवार यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारची भेट झाल्याचे समजते.

सरकारकडून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना नेमकं काय आश्वासन देण्यात आले आहे. याबाबतची माहिती सोमवारच्या भेटीदरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनाही सविस्तरपणे आपल्याकडून कोणती आश्वासने देण्यात आली आहेत, ते सांगितले. तसंच आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजात निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी आगामी काळात नेमकी काय पावले उचलली जावीत, याबाबत मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतले असण्याची शक्यता आहे.

भुजबळांच्या भेटीवेळी पवारांनी काय म्हटले होते?

छगन भुजबळ यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी स्पष्ट केले होते की, "सरकारच्या लोकांनी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांना काय आश्वासन देण्यात आले, याबाबतची माहिती आमच्याकडे नाही. तसंच लक्ष्मण हाके यांचेही उपोषण कोणत्या आश्वासनावर सोडण्यात आले, याबाबत आम्हाला कल्पना नाही. मात्र मी पुढील एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्‍यांशी यावर चर्चा करतो आणि यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतो," असा शब्द पवार यांनी भुजबळांना दिला होता.

महायुतीची काय आहे रणनीती?

काही दिवसांपूर्वी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते हजर राहिले नव्हते. त्यावरून सत्ताधारी महायुतीने महाविकास आघाडीवर टीका केली होती. तसेच शरद पवार यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीचे नेते या बैठकीले गेले नाहीत, असा आरोपही झाला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण कलुषित झाल्याचे सांगत परिस्थिती निवळण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती. यातून अडचणीच्या ठरलेल्या आरक्षण प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलते करण्याची रणनीती महायुतीने आखल्याची चर्चा रंगत आहे.

आणखी वाचा :

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 'या' तारखेला मिळणार, अजित पवार यांनी दिली माहिती

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर
Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती