Pune MSRTC extra buses: उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन (MSRTC) पुणे विभागाने ७४ अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष बसेस १४ एप्रिल ते १० जून या कालावधीत पुण्याहून विविध जिल्हे आणि तीर्थक्षेत्रांसाठी धावणार आहेत.
गावची वाट झाली सोपी! उन्हाळी सुट्टीत पुण्यातून सुटणार ७४ जादा एसटी बसेस
पुणे: उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते गावाला जाण्याचे! पण ऐन सुट्ट्यांच्या हंगामात बसमधील गर्दी आणि आरक्षणाची कसरत यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांची हीच गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) पुणे विभागाने कंबर कसली असून उन्हाळी सुट्ट्यांसाठी ७४ अतिरिक्त बसेस सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
25
१४ एप्रिलपासून 'जादा' बसेसचा प्रवास सुरू
विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या, लग्नसराई आणि गावी जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे विभागाने हे नियोजन केले आहे. या विशेष बसेस १४ एप्रिल ते १० जून २०२६ या कालावधीत धावणार आहेत. यामुळे पुण्यातील प्रमुख बसस्थानकांवरील गर्दीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.
35
प्रमुख कोणत्या मार्गांवर धावणार बसेस?
पुण्याहून विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. हे लक्षात घेऊन पुणे विभागाने खालील महत्त्वाच्या मार्गांवर जादा बसेसचे नियोजन केले आहे.
पुणे विभागातील औद्योगिक पट्ट्यात काम करणारे कामगार, शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे खाजगी ट्रॅव्हल्सकडून होणाऱ्या लूटमारीलाही लगाम बसणार आहे.
“उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या प्रचंड वाढते. ही गर्दी विभागण्यासाठी आम्ही ७४ जादा बसेस रस्त्यावर उतरवत आहोत. प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.” कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे एसटी विभाग.
55
प्रवाशांनी या जादा बसेसचे आरक्षण एसटीच्या पोर्टलवरून करावे
प्रवाशांनी या जादा बसेसचे आरक्षण एसटीच्या अधिकृत पोर्टलवरून किंवा बसस्थानकावरील खिडकीवरून करावे, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.