पुण्यात अवकाळी पावसाचा हाहाकार! झाड अंगावर कोसळून महिलेचा जागीच मृत्यू; पोलिसांनी जीव धोक्यात घालून दोघांना वाचवले

Published : Apr 02, 2026, 07:44 PM IST
IMD Rain Alert

सार

Pune unseasonal rain accident: पुण्यात सिंहगड रोड परिसरात अवकाळी पावसामुळे झाड कोसळून रंजना नवनाथ गिरी या महिलेचा मृत्यू झाला, तर दोन जणांना वाचवण्यात यश आले. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक झाडांची छाटणी आणि नालेसफाईचे काम तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आज एका कुटुंबावर काळाचा घाला घातला. सिंहगड रोडवरील नवश्या मारुती मंदिर परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एक अजस्त्र झाड उन्मळून पडले. या भीषण दुर्घटनेत रंजना नवनाथ गिरी या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर झाडाखाली दबलेल्या इतर दोन जणांना वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

नेमकी घटना काय?

दुपारच्या सुमारास पुणे शहरात अचानक सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील नवश्या मारुती मंदिर परिसरात रंजना गिरी आणि इतर दोन नागरिक उभे असतानाच, रस्त्यालगतचे एक मोठे झाड अचानक त्यांच्या अंगावर कोसळले. झाडाचा पसारा मोठा असल्याने तिघेही जण फांद्यांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

पोलिसांचे धाडसी बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पावसाचा जोर सुरू असतानाही पोलिसांनी आपल्या जिवाची पर्वा न करता झाडाखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अथक परिश्रमानंतर दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, मात्र रंजना गिरी यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा प्राण वाचू शकला नाही. पोलिसांच्या या तत्परतेचे परिसरात कौतुक होत असले तरी, या दुर्घटनेमुळे संपूर्ण पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे.

महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

अवकाळी पावसामुळे शहरात झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा दीपक नागपूरे यांनी तातडीने बैठक घेऊन प्रशासनाला कडक आदेश दिले आहेत.

धोकादायक झाडांची छाटणी: शहरातील वाळलेली आणि धोकादायक झाडे तसेच फांद्या तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

नालेसफाईला वेग: पावसाळी गटारे आणि नाल्यांची सफाई युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन सज्ज: महापालिकेच्या ५ ही परिमंडळांतील उपायुक्तांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वादळी पावसाच्या वेळी जुन्या झाडांखाली किंवा कमकुवत बांधकामांजवळ उभे राहू नये आणि कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक