Pune News : महागाईला पुणेरी दणका! फक्त काही रुपयांत 'रॉयल' प्रवास; पुण्याच्या पर्यावरणपूरक बससेवेचा देशात नवा रेकॉर्ड

Published : Dec 21, 2025, 04:24 PM IST
pmpml bus

सार

Pune PMPML Eco Friendly Buses : पुणे शहराने पीएमपीएमएल बससेवेच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचा एक नवा 'पुणेरी पॅटर्न' सादर केला आहे, जो देशातील सर्वात मोठा पर्यावरणस्नेही बस ताफा म्हणून ओळखला जात आहे.  

पुणे : सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात पुणे शहराने पुन्हा एकदा देशाला दिशा दाखवली आहे. पीएमपीएमएल (PMPML) बससेवेच्या माध्यमातून पुण्यात स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा आदर्श ‘पुणेरी पॅटर्न’ उभा राहिला असून, देशातील सर्वात मोठा पर्यावरणस्नेही बस ताफा पुण्याकडे असल्याचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे.

अवघ्या 5, 10 आणि 20 रुपयांत प्रवास

सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसच्या वाढत्या वापरामुळे पीएमपीएमएलने सर्वसामान्य पुणेकरांचा प्रवास अधिक परवडणारा केला आहे. केवळ पाच, दहा आणि वीस रुपयांत शहरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत पीएमपीएमएलने नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा आर्थिक ताण कमी केला आहे. सध्या दररोज जवळपास दहा लाख प्रवासी या सेवेतून प्रवास करत आहेत.

आधुनिक बसमुळे प्रवास अधिक सुखकर

नवीन वातानुकूलित, आरामदायी आणि आधुनिक बसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी झाला आहे. बसच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे गर्दीवर नियंत्रण आले असून फेऱ्यांची वारंवारताही वाढवण्यात आली आहे. विशेषतः महिला, विद्यार्थी, नोकरदार आणि कष्टकरी वर्गासाठी या सेवांचा मोठा फायदा होत आहे.

‘अटल’ आणि ‘पुण्यदशम’ बससेवेची मोठी भूमिका

सर्वसामान्य नागरिकांसाठी पीएमपीएमएलने ‘अटल बससेवा’ आणि ‘पुण्यदशम’ या दोन महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत.

अटल बससेवा – अवघ्या 5 रुपयांत 5 किलोमीटर प्रवास

पुण्यदशम बस – फक्त 10 रुपयांत शहरातील प्रमुख भागांत जलद प्रवास

स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि महात्मा गांधी बस स्थानक (पुलगेट) यांसह मध्य पुण्यातील 9 प्रमुख मार्गांवर पुण्यदशम बस धावत असून, प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

PMPML कडे सुमारे 2 हजार बसचा ताफा

सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे 2,000 बस कार्यरत आहेत. त्यामध्ये

1,328 सीएनजी बस

490 इलेक्ट्रिक बस

217 डिझेल बस

डिसेंबर 2025 अखेर डिझेल बस पूर्णपणे बंद करण्याचे धोरण राबवले जात असून, त्यामुळे शहरातील वायू प्रदूषणात मोठी घट होणार आहे.

पुण्यासाठी आणखी 2 हजार पर्यावरणपूरक बस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारकडून पुण्यासाठी अजून 2,000 पर्यावरणपूरक बस मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये 1,000 सीएनजी आणि 1,000 इलेक्ट्रिक बस असणार आहेत. यामुळे पीएमपीएमएलचा पर्यावरणस्नेही ताफा आणखी मजबूत होणार आहे.

पुणेकरांचा सकारात्मक प्रतिसाद

या निर्णयांमुळे पुण्यात प्रदूषण कमी होण्यासोबतच नागरिकांना वेगवान, स्वस्त आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पीएमपीएमएलच्या या परिवर्तनाला पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Pune Metro : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी! स्थानकांची नवी नावे जाहीर; तुमच्या स्टेशनचे नाव काय?
राहाता-शिर्डी पालिकेत भाजपचा दणदणीत विजय! निकालानंतर विखे पिता–पुत्रांचा जल्लोष, वाचा नगर पंचायत आणि नगर परिषदेचे निकाल