Pune Metro : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी! स्थानकांची नवी नावे जाहीर; तुमच्या स्टेशनचे नाव काय?

Published : Dec 21, 2025, 07:17 PM IST

Pune Metro : पुणे मेट्रोने मंडई, नळस्टॉप, आयडियल कॉलनी या ३ महत्त्वाच्या स्थानकांची नावे बदलून अनुक्रमे महात्मा फुले मंडई, एसएनडीटी, पौड फाटा अशी केली. लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांच्या मागणीनंतर हा बदल करण्यात आला आहे. 

PREV
15
पुणेकरांसाठी मोठा बदल!

पुणे : पुणे मेट्रोने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, शहरातील काही मेट्रो स्थानकांची नावे अधिक ओळखीची आणि परिसराशी सुसंगत अशी बदलण्यात आली आहेत. मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत सर्व संबंधित स्थानकांवरील नेमप्लेट बदलण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून होत असलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून, पुणेकरांमध्ये याबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे. 

25
कोणकोणत्या मेट्रो स्थानकांची नावे बदलली?

पुणे मेट्रो प्रकल्पातील तीन महत्त्वाच्या स्थानकांचे नामकरण बदलण्यात आले आहे. बदललेली जुनी आणि नवी नावे पुढीलप्रमाणे

मंडई मेट्रो स्थानक - ‘महात्मा फुले मंडई’

नळस्टॉप मेट्रो स्थानक - ‘एसएनडीटी’

आयडियल कॉलनी मेट्रो स्थानक - ‘पौड फाटा’

महामेट्रोतर्फे सांगण्यात आले की, या नव्या नावांनुसार सर्व मेट्रो स्थानकांवरील फलक लवकरच बदलले जातील. 

35
बदलामागचं कारण काय?

लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांकडून काही मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. विशेषतः मंडई परिसरातील स्थानकाला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देण्यात यावं, अशी आग्रही मागणी होती. माळी महासंघ या सामाजिक संघटनेने यासंदर्भात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) कडे निवेदन दिलं होतं. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. 

45
परिसराशी सुसंगत नामकरण

वनाझ ते रामवाडी मार्गिकेवरील नळस्टॉप स्थानक एसएनडीटी कॉलेजच्या जवळ असल्यामुळे त्याला ‘एसएनडीटी’ हे नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, आयडियल कॉलनी स्थानक परिसरातील प्रमुख चौक ओळख लक्षात घेऊन, या स्थानकाचं नाव ‘पौड फाटा’ असं करण्यात आलं आहे. 

55
केंद्र सरकारची मंजुरी, आनंदोत्सव साजरा

या तिन्ही मेट्रो स्थानकांच्या नव्या नामकरणाला केंद्र सरकारने अधिकृत मंजुरी दिल्याची माहिती महामेट्रोतर्फे देण्यात आली. मंजुरी मिळताच संबंधित सामाजिक संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला. नव्या नावांमुळे प्रवाशांना स्थानक ओळखणे अधिक सोपे होणार असून, पुणे मेट्रोचा प्रवास आणखी सुकर होण्यास मदत होणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories