आतापर्यंत पुणे मेट्रोच्या स्थानकांवर तुम्ही प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना हे 'ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन' (AFC) गेट्स कायम उघडे असायचे. जेव्हा एखादा प्रवासी चुकीचे तिकीट वापरायचा, तेव्हाच हे गेट्स बंद व्हायचे. मात्र, उद्यापासून ही पद्धत पूर्णपणे बदलणार आहे.
नेहमी बंद राहतील गेट्स: आता मेट्रो स्टेशनवरील हे गेट्स आधीपासूनच 'बंद' स्थितीत असतील.
स्कॅन केल्यावरच प्रवेश: जेव्हा प्रवासी आपले तिकीट, क्यूआर कोड किंवा मेट्रो कार्ड मशीनवर स्कॅन करतील, तेव्हाच हे गेट्स उघडतील.
शिस्तबद्ध प्रवास: प्रवाशांना अधिक शिस्त लावण्यासाठी आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी पुणे मेट्रोने हा जागतिक दर्जाचा बदल स्वीकारला आहे.